First waste to Hydrogen plant in India | पुणे महापालिका प्रायोगिक तत्त्वावर ०.६ टन हायड्रोजन ची करणार निर्मिती!
| निरी च्या अहवालानुसार एक एक टप्पा जाणार पुढे
First waste to Hydrogen plant in India | हायड्रोजन निर्मिती बाबत पुणे महापालिकेने (Pune Municipal Corporation (PMC) एक पाऊल पुढे टाकले आहे. प्रायोगिक तत्त्वावर ०.६ टन हायड्रोजन ची निर्मिती (Pilot project of Hydrogen plant in Pune) केली जाणार आहे. प्रायोगिक तत्त्वावर तयार होणारा हायड्रोजन पीएमपी बससाठी (PMPML Bus) इंधन म्हणून वापरला जाणार आहे. दरम्यान हा प्रकल्प देशातील किंवा जगातील पहिलाच असला तरीही महापालिका आपल्यावर आर्थिक बोजा येऊ नये, यासाठी दक्षता घेणार आहे. अशी माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ कुणाल खेमणार (Dr Kunal Khemnar IAS) यांनी दिली. (First waste to Hydrogen plant in India)
पुणे महापालिका, वेरियट पुणे वेस्ट टू एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड आणि द ग्रीन बिलियन्स लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून रामटेकडी येथील महापालिकेच्या जागेत भारतातील पहिला हायड्रोजन गॅस निर्मिती प्रकल्प (Where is PMC Setting up India’s first waste-to-hydrogen plant in Pune?) उभारला जाणार आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाने (MPCB) हा प्रकल्प उभारण्यास परवानगी दिली आहे. शिवाय निरी,मुंबईच्या IIM सारख्या संस्थांनी याबाबत positive Reports दिले आहेत. मात्र हा प्रकल्प पुढे जाताना दिसत नव्हता. कारण महापालिकेला अपेक्षा आहे कि याबाबत केंद्र सरकारचा निधी मिळेल. केंद्र आणि राज्य सरकारने ग्रीन हायड्रोजन धोरण तयार केले आहे. त्यानुसार निधी मिळण्याबाबत महापालिकेने दोन्ही सरकारशी पत्रव्यवहार केला आहे. दरम्यान याबाबत अजून एक पाऊल पुढे जाण्यासाठी आणि आर्थिक बाबी तपासून पाहण्यासाठी महापालिकेच्या वतीने आर्थिक तांत्रिक विश्लेषण समितीची बैठक बोलावली होती. यात प्रकल्पाबाबत सकारात्मक चर्चा झाली. (waste to Hydrogen plant in Pune)
याबाबत डॉ खेमणार यांनी सांगितले कि या प्रकल्पात आम्ही निरी च्या अहवालानुसार एक एक टप्पा पुढे जाणार आहोत. त्यानुसार पहिला टप्पा हा प्रायोगिक तत्वावर असणार आहे. त्यात ०.६ टन हायड्रोजन निर्माण केला जाणार आहे. त्यात यशस्वी झाल्यावर 200 टन आणि शेवटी 350 टन चा प्रकल्प केला जाणार आहे. त्यासाठी आधी आम्ही हा प्रस्ताव मंजूरीसाठी महापालिका आयुक्त यांच्यासमोर ठेवणार आहोत. डॉ खेमणार यांनी पुढे सांगितले कि, रामटेकडी येथील प्रकल्पात तयार होणारा हायड्रोजन पीएमपीसाठी दिला जाणार आहे. त्याच्या वापराने इंधनाची किती बचत होईल, खर्च कसा वाचेल याची माहिती घेतली जाणार आहे. याबाबत आम्ही पीएमपीला देखील प्रस्ताव सादर करणार आहोत. कारण पीएमपीला सीएनजी पेक्षा हायड्रोजन स्वस्त पडला तरच पुढे जाता येणार आहे.
—-
महापालिकेचा हायड्रोजन प्रकल्प हा देशातील किंवा जगातील पहिलाच प्रकल्प असला तरीही आम्ही महापालिकेवर कुठलाही आर्थिक बोजा येऊ देणार नाही. त्यामुळे महसूल मॉडेल बाबत (Revenue Model) आम्ही संबंधित कंपनीसोबत करार (Agreement) करू. तसेच आम्ही जे प्रकल्पात पैसे गुंतवणार आहोत, त्याची बँक ग्यारंटी (Bank Guarantee) घेऊनच आम्ही पुढे जाऊ.
– डॉ कुणाल खेमणार, अतिरिक्त आयुक्त, पुणे महापालिका.