Rejuvenation Project | PMC Pune | कै. विलासराव तांबे नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रास प्रथम क्रमांकाचे बक्षीस

HomeBreaking Newsपुणे

Rejuvenation Project | PMC Pune | कै. विलासराव तांबे नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रास प्रथम क्रमांकाचे बक्षीस

Ganesh Kumar Mule Dec 20, 2022 1:12 PM

Narendra Dabholkar | रक्त देऊन इतरांचे प्राण वाचवणं ही अहिंसा | ८० जणांचे रक्तदान | महा. अंनिसच्या शिवाजीनगर शाखेचा उपक्रम
International Ozone Day | अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालयामध्ये आंतरराष्ट्रीय ओझोन दिन साजरा
Meri Mati Mera Desh Abhiyan | देशासाठी आपल्या प्राणांचे बलिदान दिलेल्या ‘वीरांना’ श्रद्धांजली वाहण्यासाठी “मेरी माटी मेरा देश” मोहीम

कै. विलासराव तांबे नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रास प्रथम क्रमांकाचे बक्षीस

| “कायाकल्प प्रकल्पात पुणे महानगरपलिका सर्वोत्कृष्ट”

आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये कायाकल्प प्रकल्प (Rejuvention project) कार्यक्रमांतर्गत पुणे महानगरपालिकेमधील (PMC Pune)  ६ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रे (Primary health center) यांनी  सहा लाख रुपये चे बक्षीस मिळवले असून त्यापैकी कै. विलासराव तांबे नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रास प्रथम क्रमांकाचे बक्षीस दोन लाख रुपये राज्य सरकारकडून घोषित झाले आहे.  अशी माहिती महापालिका आरोग्य विभागाकडून देण्यात आली. (Pune Municipal Corporation)
पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागांतर्गत राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानाच्या माध्यमातून विविध आरोग्य विषयक राष्ट्रीय कार्यक्रम राबविण्यात येतात. यामध्ये स्वच्छ भारत अभियानाचा एक भाग म्हणून आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये पुणे महानगरपालिकेच्या सर्व आरोग्य संस्थांमध्ये कायाकल्प कार्यक्रम राबविण्यात आला होता.
“कायाकल्प कार्यक्रमांतर्गत आरोग्य संस्थांमार्फत देण्यात येणाऱ्या गुणवत्ता पूर्ण सेवांसोबतच रुग्णालयाची स्वच्छता, संसर्ग नियंत्रण इ. बाबींवर मुख्यतः काम करण्यात येते. या कार्यक्रमाच्या अंमलबजावणी दरम्यान प्रत्येक संस्थांचे
संस्थास्तरीय परीक्षण समिती मार्फत करण्यात येते. अंतिम परीक्षण पार पाडल्यानंतर प्राथमिक आरोग्य संस्था आणि प्रसुतीगृहांना, महानगरपालिका तसेच राज्य स्तरावर उत्कृष्ट काम केलेल्या आरोग्य संस्थांना बक्षीस देण्यात येतात.
आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये सदर कार्यक्रमांतर्गत पुणे महानगरपालिकेमधील ६ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रे यांनी रक्कम रुपये ६.०० लक्ष (अक्षरी रुपये सहा लाख रुपये) चे बक्षीस मिळवले असून त्यापैकी कै. विलासराव तांबे नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रास प्रथम क्रमांकाचे बक्षीस रक्कम रुपये २.०० लक्ष (अक्षरी रुपये दोन लाख रुपये) राज्य सरकारकडून घोषित झाले आहे. याकरिता  प्रशासक तथा आयुक्त पुणे महानगरपालिका विक्रम कुमार, मा. अति. आयुक्त  रवींद्र बिनवडे, आरोग्य अधिकारी,  डॉ. आशिष भारती. सहा. आरोग्य अधिकारी, डॉ. वैशाली जाधव. नोडल अधिकारी डॉ. राजेश दिघे पुणे महानगरपालिका यांच्या मार्गदर्शनाखाली तत्कालीन शहर गुणवत्ता
आश्वासन समन्वयक, डॉ. भालचंद्र प्रधान व सध्याचे शहर गुणवत्ता आश्वासन समन्वयक, डॉ. दिपाली क्षीरसागर पुणे महानगरपालिका तसेच संबंधित प्राथमिक नागरी आरोग्य केंद्राकडील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले आहेत.
कै. विलासराव तांबे प्राथमिक आरोग्य केंद्र, धनकवडी, पुणे – २.०० लक्ष
स्व. प्रेमचंद ओसवाल प्राथमिक आरोग्य केंद्र, बिबवेवाडी, अप्पर इंदिरानगर, पुणे – १.५० लक्ष
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे प्राथमिक आरोग्य केंद्र, मित्रमंडळ चौक, पुणे – १.०० लक्ष
कै. बाबुराव गेनबा शेवाळे प्राथमिक आरोग्य केंद्र, औंध रोड, पुणे- ५० हजार
युगपुरुष राजा शिवछत्रपती प्राथमिक आरोग्य केंद्र, व्ही. आय.टी. कॉलेजसमोर, अप्पर, पुणे – ५० हजार
कै. मुरलीधर पांडुरंग लायगुडे प्राथमिक आरोग्य केंद्र, धायरी, पुणे – ५० हजार