Uddhav Thackeray : तलवार जरी माझ्या हातात नसली तरी तलवार कशी गाजवायची हे माझ्या नसानसांत भिनलेलं  : उद्धव ठाकरे 

HomeBreaking NewsPolitical

Uddhav Thackeray : तलवार जरी माझ्या हातात नसली तरी तलवार कशी गाजवायची हे माझ्या नसानसांत भिनलेलं : उद्धव ठाकरे 

Ganesh Kumar Mule Jan 23, 2022 3:10 PM

Maratha Reservation : मराठा समाजासाठी स्वतंत्र समर्पित मागासवर्ग आयोग
Uddhav Thackeray’s first reaction : एमआयएम  च्या प्रस्तावानंतर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
Eknath Shinde Vs Shivsena | एकनाथ शिंदे यांचा सवाल  | दाऊदशी थेट संबंध असणाऱ्यांना शिवसेना समर्थन कशी करू शकते…? 

तलवार जरी माझ्या हातात नसली तरी तलवार कशी गाजवायची हे माझ्या नसानसांत भिनलेलं

: उद्धव ठाकरे

मुंबई : मुख्यमंत्री कुठे आहेत? असा वारंवार सवाल करणाऱ्या विरोधकांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी आज उत्तर दिलं आहे. “मी घराबाहेर पडलो नसलो तरी मी असमर्थ आहे असं नाही, अशा शब्दांत त्यांनी विरोधकांना उत्तर दिलंय आहे. मुंबई महापालिकेच्यावतीनं उभारण्यात आलेल्या महाराणा प्रताप (Maharana Pratap) यांच्या अश्वारुढ पुतळ्याचं उद्घाटन ऑनलाइन स्वरुपात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं, यावेळी ते बोलत होते. (Although I am not out of the house it doesnt mean I am incapable says CM Uddhav Thackeray)

मुख्यमंत्री म्हणाले, “गेल्या काही काळामध्ये एका शस्त्रक्रियेला मला समोरं जावं लागलं. त्यानंतर मी अजूनही तसा घराबाहेर पडलेलो नाही पण असं असलं तरी याचा अर्थ असा नाही की, मी बाहेर पडायला असमर्थ आहे. मी सुद्धा शिवसेनाप्रमुखांचा पुत्र आहे. तलवार जरी माझ्या हातात नसली तरी तलवार कशी गाजवायची हे माझ्या नसानसांत भिनलेलं आहे. त्यामुळं जेव्हा फिरवायची त्या योग्यवेळी ती फिरवत आलेलो आहेच आणि यापुढेही फिरवणार आहेच. शिवसेना प्रमुखांच्या पुण्याईनं सर्व शिवसैनिक माझ्या आणि आदित्यच्या पाठिशी आहात त्यामुळं धन्यवाद”

शिवसेनाप्रमुखांच्या जन्मदिवसादिनीच वीर महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याचं आपण अनावरण केलं आहे. पुतळे बसवायला अनेक जागा आहेत पण नेमका आपण कोणाचा वारसा सांगत आहोत हे सांगण्याचं, आठवण देण्याचं काम तुम्ही केलं आहे. शिवाजी महाराज किंवा महाराणा प्रताप आपण होऊ शकत नाही पण त्यांचा घोडा म्हणजेच चेतक जरी आपण झालो तरी आपल्याकडून मोठ काम होईल. हा घोडा आपल्या धन्याचा निष्ठावान होता.

मुंबई महापालिकेच्यावतीनं महाराणा प्रताप चौकाच्या सुशोभिकरणाचं काम हाती घेण्यात आलं आहे. यावेळी या चौकात महाराणा प्रताप यांचा भालाधारी १६ फूट उंचीचा अश्वारुढ पुतळा उभारण्यात आला. याचं अनावरण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते रविवारी पार पडलं.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0