Electricity Price Hike | वीज दरवाढीचा निषेध करण्यासाठी उद्या पुण्यातील रास्ता पेठेत सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वात आंदोलन!
Electricity Price Hike – (The Karbhari News Service) – राज्य सरकारने नुकतेच विजेच्या दरात वाढ केली आहे. याचा निषेध करण्यासाठी उद्या पुण्यातील रास्ता पेठेत खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात येणार आहे. अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिली.
जगताप यांनी सांगितले कि, आर्थिक आघाडीवर सपशेल अयशस्वी ठरलेल्या, महाराष्ट्राच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर उभा करणाऱ्या सरकारने आता स्वतःची तिजोरी भरण्यासाठी सामान्य जनतेच्या घरावर दरोडा टाकण्याची तयारी केली आहे. याचंच लक्षण म्हणजे नुकतीच झालेली वीज दरवाढ. जवळपास १५% दरवाढ करून सरकारने महागाईचे चटके सोसत असलेल्या सामान्य जनतेला शॉक दिला आहे. सरकारच्या या अन्यायकारक धोरणाच्या निषेधार्थ खा. सुप्रियाताई सुळे व शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पार्टीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे.