Dr Siddharth Dhende | सावली संस्थेतील निराधार मुलांना शैक्षणिक मदतीचा आधार | माजी उपहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांचा पुढाकार

HomeBreaking Newsपुणे

Dr Siddharth Dhende | सावली संस्थेतील निराधार मुलांना शैक्षणिक मदतीचा आधार | माजी उपहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांचा पुढाकार

Ganesh Kumar Mule Aug 13, 2023 4:28 PM

Vishrantwadi-Dhanori road | Dr Siddharth Dhende | विश्रांतवाडी-धानोरी रस्ता रुंदीकरणाचा मार्ग मोकळा | माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांच्या पाठपुराव्याला यश
Pune Balsnehi Chowk |प्रभाग २ मधील बालस्नेही चौकाचे लोकार्पण | माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांचा यशस्वी पाठपुरावा
Dr Siddharth Dhende | भुयारी मेट्रोसह, संरक्षण विभागाच्या हद्दीतील बांधकामावर होणार सकारात्मक निर्णय

Dr Siddharth Dhende | सावली संस्थेतील निराधार मुलांना शैक्षणिक मदतीचा आधार | माजी उपहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांचा पुढाकार

| संस्थेतील १०० विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्याची मदत

Dr Siddharth Dhende | शिक्षणापासून वंचित असणाऱ्या निराधार मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी  पुणे महापालिकेचे माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे (Dr Siddharth Dhende) यांनी पुढाकार घेतला आहे. त्या अनुषंगाने पुण्यातील ताडीवाला रोड येथील सावली संस्थेतील (Savali Organization) १०० निराधार मुलांना (Orphans) त्यांनी शैक्षणिक साहित्याचे मोफत वाटप केले आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने (आठवले गट)  पुण्यातील कार्यालयात हा कार्यक्रम पार पडला.
या वेळी सावली संस्थेचे अमित मोहिते, आरपीआयचे जेष्ठ नेते बाळासाहेब जानराव, माजी नगरसेवक अशोक कांबळे, मंदार जोशी, बाबुराव घाडगे, बसवराज गायकवाड आदींसह विद्यार्थी या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त १३२ विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारण्याचा संकल्प डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी केला होता. येत्या शैक्षणिक वर्षापासून त्याची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली जाणार असल्याचा निर्धार देखील त्यांनी व्यक्त केला होता. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी हा उपक्रम आयोजित केला. ताडीवाला रोड येथील सावली संस्थेमार्फत फुटपाथवर फिरणारी मुले, अनाथ मुले यांचा सांभाळ करून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे काम केले जात आहे. या संस्थेतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीत गती देण्यासाठी हा उपक्रम राबवल्याचे डॉ. धेंडे यांनी सांगितले.
या वेळी आरपीआयचे जेष्ठ नेते बाळासाहेब जानराव म्हणाले की, आई वडिलांचे लहानपणीच छत्र हरविल्यानंतर मुलांचे आयुष्य भरकटले जाते. त्यांना शिक्षण, नोकरी, योग्य जगण्याचे मार्गदर्शन होत नाही. शिक्षणापासून मुले दूर झाली तर ती गैरमार्गाला लागण्याची शक्यता असते. तसेच देशाची प्रगती देखील खुंटते. त्यामुळे या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा डॉ. धेंडे यांचा उपक्रम अतिशय महत्त्वाचा आहे. अनेकांनी हा उपक्रम हाती घेणे गरजेचे असल्याचे जानराव म्हणाले.
——————-
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित होऊन मी माझे काम करतो. यंदा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त 132 विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक खर्चाचा भार उचलण्याचा मी संकल्प केला होता. त्यानुसार विविध समाजातील गोरगरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक हातभार लावण्याचा मी छोटासा प्रयत्न करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून सावली संस्थेतील या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे मोफत वाटत मला करावेसे वाटले. त्याचे मला समाधान आहे. शिक्षण घेतलेली विद्यार्थ्यांची पिढी घडली तर देश देखील समृद्ध झाल्याशिवाय राहणार नाही.
– डॉ. सिद्धार्थ धेंडे, माजी उपमहापौर, पुणे महापालिका
——-