Dr Ramesh Shelar | अकार्यकारी पदाचा अतिरिक्त पदभार कार्यकारी उपायुक्तांकडे कसा? डॉ रमेश शेलार यांनी उपस्थित केला प्रश्न 

HomeBreaking Newsपुणे

Dr Ramesh Shelar | अकार्यकारी पदाचा अतिरिक्त पदभार कार्यकारी उपायुक्तांकडे कसा? डॉ रमेश शेलार यांनी उपस्थित केला प्रश्न 

गणेश मुळे Jun 07, 2024 3:35 PM

Swimmer Sampanna Shelar | पुण्याचा जलतरणपटू संपन्न शेलार याचा अरबी सुमद्रात अनोखा विक्रम!  | सव्वा चार तासांत सुमारे 28.5 किमी अंतर पोहून केले पार 
Dr Ramesh Shelar PMC | डॉ रमेश शेलार यांचा पीएचडी केल्याबद्दल राज्यपालांच्या हस्ते गोल्ड मेडल देऊन सन्मान! | कार्यकारी पद देण्याची मागणी
Dr Ramesh Shelar | डॉ रमेश शेलार यांची महापालिका सामान्य प्रशासन विभागाची विभागीय आयुक्त यांच्याकडे तक्रार!

Dr Ramesh Shelar | अकार्यकारी पदाचा अतिरिक्त पदभार कार्यकारी उपायुक्तांकडे कसा? डॉ रमेश शेलार यांनी उपस्थित केला प्रश्न

Dr Ramesh Shelar – (The Karbhari News Service) – पुणे महापालिकेत (Pune Municipal Corporation (PMC) एक उपायुक्त अकार्यकारी पदावर काम करत आहेत. ते सध्या सुट्टीवर आहेत. त्यामुळे त्यांचा अतिरिक्त पदभार कार्यकारी उपायुक्त यांच्याकडे देण्यात आला आहे. पर्यावरण व्यवस्थापक (अकार्यकारी) डॉ रमेश शेलार (Dr Ramesh Shelar PMC) यांनी ही बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली आहे. (Pune PMC News)
याबाबत डॉ शेलार यांनी सामान्य प्रशासन विभागाच्या उपायुक्तांना पत्र दिले आहे. त्यानुसार स्थानिक संस्था कर विभागाचे उपायुक्त विजय लांडगे हे अकार्यकारी पदावर काम करत आहेत. 16 जूनपर्यंत त्यांना रजा मंजूर करण्यात आली आहे. त्यामुळे त्या पदाचा अतिरिक्त पदभार हा उपायुक्त राजीव नंदकर यांच्याकडे देण्यात आला आहे. नंदकर हे कार्यकारी उपायुक्त आहेत. त्यामुळे अकार्यकारी पदाचा पदभार कार्यकारी पदाच्या उपायुक्त यांच्याकडे सोपवला जाईल का? असा प्रश्न डॉ शेलार यांनी या निमित्ताने उपस्थित केला आहे.
पुणे महापालिकेच्या घनकचरा विभागात (PMC Solid Waste Management Department) रमेश शेलार (Ramesh Shelar) हे पर्यावरण व्यवस्थापक (अकार्यकारी) म्हणून काम पाहत आहेत. मात्र असे पद देताना प्रशासनाने चुकीचा संदर्भ दिला आहे, असे शेलार यांनी याआधीच प्रशासनास निदर्शनास आणून दिले आहे. तसेच दोन महिने कार्यकारी पद देऊन पुन्हा अकार्यकारी पद प्रशासनाने दिले, हे माझ्यावरच्या आकसापोटी केले असल्याचा आरोप देखील शेलार यांनी केला होता. तसेच आता तरी प्रशासनाने आपली चूक सुधारून कार्यकारी पद द्यावे, अशी मागणी शेलार यांनी महापालिका आयुक्त यांच्याकडे केली होती. (Pune Municipal Corporation)