Dr Rajendra Bhosale IAS | महापालिका आयुक्त डॉ राजेंद्र भोसले यांची पाणी शिरलेल्या भागात भेट

HomeBreaking Newsपुणे

Dr Rajendra Bhosale IAS | महापालिका आयुक्त डॉ राजेंद्र भोसले यांची पाणी शिरलेल्या भागात भेट

गणेश मुळे Jul 25, 2024 8:40 AM

Dr Rajendra Bhosale IAS | आपण सनदी नोकर आहात महापालिकेचे मालक नाही | महापालिका आयुक्तांवर विवेक वेलणकर कडाडले!
Why are you working till the midnight of 13th April to prepare for Ambedkar Jayanti? | Pune Municipal Commissioner’s question to the officials
PMC Deputy Commissioner | इब्राहिम चौधरी यांची पुणे महापालिकेत प्रति नियुक्तीने उपायुक्त पदी नियुक्ती! | निवडणूक आयोगाच्या आदेशाने कुणाची बदली होणार?

Dr Rajendra Bhosale IAS | महापालिका आयुक्त डॉ राजेंद्र भोसले यांची पाणी शिरलेल्या भागात भेट

 

Pune Rain Update- (The Karbhari News Service) – पुणे शहरात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. राजेन्द्र भोसले, हे ज्या भागात पावसाचे पाणी शिरले आहे, अशा भागात स्वत: भेट देत पाहणी करीत असून तेथे योग्य त्या उपाययोजना करणेबाबत मनपा अधिकारी व कर्मचारी यांना निर्देश देत आहेत. (Pune Rain)

तसेच आपत्कालीन परिस्थितीमध्ये पुणे महानगरपालिकेच्या आपत्ती निवारण कक्षाला संपर्क करण्याचे आवाहन देखील त्यांनी केले आहे.

आपत्तीजन्य परिस्थितीत पुणे महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षाला पुढील नंबरवर संपर्क करा :
020 – 25501269
020 – 25506800

पुणे शहरात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर आयुक्त  डॉ. राजेन्द्र भोसले यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. सिंहगड येथील एकता नगरी परिसरात भेट देत पाहणी करीत नागरिकांशी संवाद साधत मनपा अधिकारी व कर्मचारी यांना योग्य ते निर्देश दिले.