Dr Rajendra Bhosale IAS | क्षेत्रीय कार्यालय स्तरावर केली जाणार आरोग्य सेवकांची नेमणूक | पाण्याचा निचरा करण्यासाठी महापालिका आयुक्तांचे आदेश

HomeBreaking Newsपुणे

Dr Rajendra Bhosale IAS | क्षेत्रीय कार्यालय स्तरावर केली जाणार आरोग्य सेवकांची नेमणूक | पाण्याचा निचरा करण्यासाठी महापालिका आयुक्तांचे आदेश

गणेश मुळे Jun 08, 2024 6:06 AM

Hoarding in front of PMC Building | पुणे महापालिका भवनासमोर उभारलेल्या वादग्रस्त होर्डिंगवर अखेर कारवाई! 
Dhwajdin Nidhi | सामाजिक कर्तव्याच्या भावनेतून ध्वजदिन निधीमध्ये योगदान द्यावे- महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले
PMC Special School Students | पुणे महापालिकेच्या विशेष शाळेतील मुलांनी बनविलेल्या  वस्तूंचे प्रदर्शन आणि विक्री या उपक्रमाचा शुभारंभ

Dr Rajendra Bhosale IAS | क्षेत्रीय कार्यालय स्तरावर केली जाणार आरोग्य सेवकांची नेमणूक | पाण्याचा निचरा करण्यासाठी महापालिका आयुक्तांचे आदेश

 

Pune Municipal Corporation (PMC) – (The Karbhari News Service) पावसाळ्यामध्ये रस्त्यावरील चेंबर्सच्या जाळ्यांमध्ये कचरा अडकून पाणी अडले जाउ नये यासाठी चेंबर्सच्या जाळ्या तातडीने स्वच्छ करण्यासाठी प्रत्येक क्षेत्रिय कार्यालयांमध्ये आरोग्य सेवक नियुक्त करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. या कर्मचाऱ्यांनी पाण्याचा निचरा करण्याकडे लक्ष द्यायचे आहे. एका सत्रात 75 आरोग्य सेवक असतील, ज्यावर उप अभियंता यांचे नियंत्रण असणार आहे. (Pune PMC News)

शहरात नुकतेच झालेल्या मुसळधार पावसात अनेक रस्त्यांवर पाणी साठले होते. पाण्यासोबत वाहून येणार्‍या कचर्‍यामुळे पावसाळी गटारांच्या चेंबर्सच्या झाकणांमधून पाणी वाहून जाण्यास अडथळे येत येत असल्याचे लक्षात आल्याने आयुक्तांनी सूचना दिल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने ज्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर पाणी साठते अशा ठिकाणच्या चेंबर्सच्या सिमेंटच्या जाळ्या बदलून त्याठिकाणी लोखंडी जाळ्या बसवण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार काम सुरू करण्यात आले असून आतापर्यंत ७५ हून अधिक चेंबर्सला लोखंडी जाळ्या बसविण्याचे कामही पूर्ण झाले आहे.

पाउस सुरू असताना रस्त्यावरील चेंबर्सच्या झाकणांमध्ये रस्त्यावरील कचरा, पाला पाचोळा अडकतो. पाण्याच्या प्रवाहात अडथळा निर्माण झाल्याने रस्त्यावर पाणी साठते. अनेकदा काही सुजाण नागरिक चेंबर्सवरील कचरा काढून पाण्याला वाट काढून देण्याचा प्रयत्न करतात. या पार्श्‍वभूमीवर महापालिका आयुक्तांनी प्रथमच अशा कामांसाठी पावसाळ्याच्या काळात तीनही पाळ्यांमध्ये कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये महापालिकेच्या पंधराही क्षेत्रिय कार्यालयांच्या हद्दीत उप अभियंता आणि आरोग्य निरीक्षकाच्या नेतृत्वाखाली पंधरा कर्मचार्‍यांची टीम स्थापन करण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी आज दिले. यासोबतच प्रत्येक क्षेत्रिय कार्यालय स्तरावर चोवीस तास सुरु राहील असा आपत्ती व्यवस्थापन कक्ष, यासाठी स्वतंत्र संपर्क क्रमांकही देण्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

– शीघ्र प्रतिसाद टीम स्थापन करण्याचे आदेश

पाणी साठण्याची ठिकाणे निश्चित करण्याबाबत क्षेत्रीय स्तरावर आदेश देण्यात आले आहेत. या कामात गती आणण्यासाठी शीघ्र प्रतिसाद टीम स्थापन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या टीममध्ये आरोग्य निरीक्षक, कनिष्ठ अभियंता असे लोक असतील. एका सत्रात 25 कर्मचारी असे एकूण तीन सत्रात 75 कर्मचाऱ्यांनी काम करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.