Dr Bhagwan Pawar Suspension | पुणे महापालिकेचे आरोग्य प्रमुख म्हणून डॉ भगवान पवार यांचे निलंबन! | राज्य सरकारकडून कारवाई 

HomeBreaking Newsपुणे

Dr Bhagwan Pawar Suspension | पुणे महापालिकेचे आरोग्य प्रमुख म्हणून डॉ भगवान पवार यांचे निलंबन! | राज्य सरकारकडून कारवाई 

गणेश मुळे May 24, 2024 2:16 PM

PMC Health Officer | महापालिका आरोग्य प्रमुख डॉ भगवान पवार यांची 6 महिन्यांत बदली!
Stray Dogs Vaccination | भटक्या कुत्र्यांच्या लसीकरण आणि नसबंदी मोहिमेस अडथळा आणणाऱ्या नागरिकांवर कारवाईचा इशारा
PMC Vaccination Drive | पुणे महापालिका आगामी तीन महिने राबवणार लसीकरण मोहीम | लहान मुले आणि गरोदर मातांना लाभ

Dr Bhagwan Pawar | पुणे महापालिकेचे आरोग्य प्रमुख म्हणून डॉ भगवान पवार यांचे निलंबन! | राज्य सरकारकडून कारवाई

Dr Bhagwan Pawar – (The Karbhari News Service) – पुणे महापालिकेचे (Pune Municipal Corporation (PMC) आरोग्य प्रमुख म्हणून डॉ भगवान पवार (Dr Bhagwan Pawar PMC Health Officer) यांचे राज्य सरकारकडून निलंबन करण्यात आले आहे. डॉ पवार यांच्याविरुध्द आर्थिक अनियमितता, महिला कर्मचा-यांचा मानसिक व लैंगिक छळ, अधिकारी/कर्मचा यांसोबत अरेरावी, त्यांना मानसिक व आर्थिक त्रास देणे इत्यादी बाबत शासनास विविध गंभीर तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. पुणे महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी देखील तक्रारी दिल्या होत्या. त्यानुसार राज्य सरकारकडून ही कारवाई करण्यात आली आहे. डॉ पवार यांनी आरोग्यमंत्री डॉ तानाजी सावंत यांना दिलेले आव्हान त्यांना भोवले, असे मानले जात आहे.  (PMC Health Department)
पुणे महापालिकेचे आरोग्य प्रमुख म्हणून डॉ भगवान पवार (Dr Bhagwan Pawar) यांची राज्य सरकारकडून नुकतीच पुन्हा एकदा नियुक्ती करण्यात आली होती.  महापालिकेने बदली केल्यानंतर पवार बदली विरोधात मॅट (MAT) अर्थात महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण येथे अपील केले होते. मॅट ने त्यांच्या बाजूने निकाल दिला होता.  त्यानुसार राज्य सरकारने हे आदेश जारी केले होते. शिवाय फार वेळ न दवडता आदेशास अनुसरून कार्यवाही करावी, असे आदेश राज्याच्या नगरविकास विभागाने महापालिका आयुक्तांना दिले आहेत. (PMC Health Department)
डॉ पवार यांची पुणे महापालिकेतून नुकतीच बदली करण्यात आली होती. डॉ पवार यांच्याकडे सहायक संचालक, आरोग्य सेवा (अंधत्व नियंत्रण कार्यक्रम), मुंबई हा पदभार देण्यात आला होता. 10 मार्च 2023 ला डॉ भगवान पवार यांना महापालिका आरोग्य प्रमुख पदी प्रतिनियुक्तीने नियुक्त करण्यात आले होते. मात्र सहा महिन्यांनंतर पुन्हा डॉ पवार यांची बदली करण्यात आली होती. त्यामुळे डॉ पवार यांनी या विरोधात मॅट मध्ये अपील केले होते.
दरम्यान आता डॉ भगवान पवार (Dr Bhagwan Pawar) यांचे राज्य सरकारकडून निलंबन करण्यात आले आहे. डॉ पवार यांच्याविरुध्द आर्थिक अनियमितता, महिला कर्मचा-यांचा मानसिक व लैंगिक छळ, अधिकारी/कर्मचा यांसोबत अरेरावी, त्यांना मानसिक व आर्थिक त्रास देणे इत्यादी बाबत शासनास विविध गंभीर तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. त्यानुसार राज्य सरकारकडून ही कारवाई करण्यात आली आहे.

राज्य सरकारने आदेशात काय म्हटले आहे? 

 
महाराष्ट्र शासनाच्या कार्यासन अधिकारी सुप्रिया मुसळे यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. 
त्यानुसार डॉ. भगवान अंतु पवार, तत्कालिन जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे यांच्याविरुध्द आर्थिक अनियमितता, महिला कर्मचा-यांचा मानसिक व लैंगिक छळ, अधिकारी/कर्मचा यांसोबत अरेरावी, त्यांना मानसिक व आर्थिक त्रास देणे इत्यादी बाबत शासनास विविध गंभीर तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत.
या  गंभीर तक्रारींच्या अनुषंगाने सखोल चौकशी करण्यासाठी वरिष्ठ पातळीवर  २९.०४.२०२४ अन्वये चौकशी समिती स्थापन करण्यात आली व सदर समितीने शिफारशीसह चौकशी अहवाल सादर केला.
समितीने दिलेल्या प्राथमिक चौकशी अहवालातील शिफ़ारशी विचारात घेता. डॉ. भगवान अंतू पवार, तत्कालिन जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी गंभीर स्वरुपाची वित्तीय अनियमितता केली असल्याचे दिसून येते. तसेच, त्यांच्याविरुध्द लैंगिक शोषण, महिला अधिकान्यांना मानसिक त्रास, वित्तीय व प्रशासकीय अनियमितता, वर्तणूक विषयक तक्रारी, भ्रष्टाचार इत्यादी बाबतच्या गंभीर तक्रारी असून डॉ. भगवान अंतू पवार, तत्कालिन जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, १९७९ च्या नियम ३ चे उल्लंघन केले आहे. तसेच, त्यांनी महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ च्या तरतूदीचा भंग केला असल्याचे सकृत दर्शनी दिसून येते.
 डॉ. भगवान अंतू पवार यांची बहुतांश सेवा ही पुणे व सातारा येथे झालेली असून सदर ठिकाणी त्यांच्याविरुध्द विविध स्वरुपाच्या गंभीर तक्रारी प्राप्त असून त्यांची निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक आहे. त्याअर्थी, आता राज्यपाल महाराष्ट्र (शिस्त व अपील) नियम, १९७९ मधील नियम ४ (१) (अ) अन्वये प्रदान केलेल्या शक्तीचा वापर करून, याद्वारे डॉ. भगवान पवार यांना तात्काळ निलंबित करीत आहेत व ते पुढील आदेश काढले जाईपर्यंत निलंबित राहतील.
आणखी अरोही आदेश देण्यात येत आहेत की, हा आदेश अमलात असेल त्या कालावधीत डॉ भगवान अंतू पवार, यांचे मुख्यालय जिल्हा रुग्णालय, नंदूरबार येथे राहील आणि उक्त तरतुदीनुसार डॉ. भगवान अंबू पवार, तत्कालिन जिल्हा आरोग्य अधिकारी यांना सक्षम अधिका-यांच्या पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार नाही.