माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या भिंती चित्राचे लोकार्पण
: नगरसेविका अर्चना पाटील यांची संकल्पना
पुणे : प्रभाग क्रमांक 19 च्या नगरसेविका अर्चना तुषार पाटील यांच्या संकल्पनेतून त्यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या भिंतीवर भारतरत्न माजी राष्ट्रपती डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांचे भिंती चित्र रेखाटण्यात आले. या भिंती चित्राचे उद्घाटन माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे व परिसरातील शिक्षकांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे म्हणाले, पाटील कुटुंब नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असते. या ठिकाणी रेखाटण्यात आलेल्या डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांचे भिंतीचित्र कडे बघुन नक्कीच या भागातील तरुण तरुणीच्या जीवनामध्ये परिवर्तन होईल.
अर्चना पाटील म्हणाल्या, कासेवाडी, भवानीपेठ हा झोपडपट्टी भागातील प्रत्येक तरुणाने डॉ एपीजे अब्दुल कलाम यांचा आदर्श घेऊन आयुष्यात पुढे जावे. अतिशय साधी राहणी आणि उच्च विचारसरणी असे डॉ एपीजे अब्दुल कलाम यांचे व्यक्तिमत्त्व होते. आणि त्यांच्या याच व्यक्तिमत्वाला प्रत्येक तरुण प्रेरिक होतो. माझ्या भागातील तरुण हा आदर्श नागरिक झाला पाहिजे.
यावेळी प्रभागातील शिक्षकांचा, सामाजिक कार्यकर्त्यांचा, डॉक्टरांचा सन्मान करण्यात आला. तसेच प्रभागातील दहावीच्या विद्यार्थ्यांना 21 अपेक्षित चा संचाचे वाटप करण्यात आले. यावेळी माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे, आर पी आय चे अशोक शिरोळे, मुनावर रामपुरी, सनी अडगळे, दिनेश रासकर, लोकेश अवचीते, परवीन तांबोळी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन माथाडी कामगार संघटनेचे उपाध्यक्ष तुषार पाटील यांनी केले होते.
COMMENTS