नवीन निविदा प्रक्रिया (Tender) वेळेत पूर्ण करा
: महापालिका आयुक्त विविध विभाग आणि खाते प्रमुखावर नाराज
पुणे : महापालिका आयुक्त विविध विभाग आणि विभाग प्रमुखांवर नाराज दिसून येत आहेत. कारण एखाद्या कामाची निविदा (Tender) संपून देखील संबंधित विभाग वेळेत निविदा प्रक्रिया राबवत नाहीत. साहजिकच त्याचा विकास कामांवर परिणाम होत आहे. त्यामुळे आता आयुक्तांनी आदेश दिले आहेत कि निविदा प्रक्रिया वेळेत पूर्ण करा.
: असे आहेत आदेश
माझे असे निदर्शनास आले आहे की, बहुतांश खात्यांमध्ये/विभागामध्ये निविदा प्रक्रिया राबविताना सदर निविदेची मुदत संपल्यानंतरही नवीन निविदा प्रक्रिया सुरू करण्यात येत नाही. त्यामुळे नवीन निविदा प्रक्रिया राबविण्यास विलंब होत असल्याने शहराच्या विकास कामांवर त्याचा परिणाम होत असतो. सदरची बाब प्रशासकीयदृष्टया योग्य नाही. वरील बाब विचारात घेता, असे सूचित करण्यात येते की, सर्व खाते प्रमुख यांनी जातीने लक्ष देऊन यापुढे नवीन निविदा प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्याची दक्षता घ्यावी.
COMMENTS
धनकवडी स न 11 न्यु हिल व्हु टॅप सोसायटीत व कुमार बिल्डर यानी पुणे महानगर पालिके ची मालकी ची जागा विकली आहे