कालबद्ध पदोन्नती बाबतचे परिपत्रक महापालिका प्रशासनाकडून जारी |लाभ देण्यासाठी पदोन्नती समिती पुढे ठेवावी लागणार प्रकरणे
पुणे | पुणे महापालिकेच्या (PMC Pune) कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना कालबद्ध पदोन्नतीचा (Time Bound Promotion) लाभ देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. संबंधित प्रस्तावावर महापालिका आयुक्तांची (PMC Commissioner) स्वाक्षरी झाल्यानंतर प्रशासना कडून याबाबतचे परिपत्रक (Circular) जारी करण्यात आले आहे. जवळपास ५ ते ६ हजार कर्मचारी यासाठी पात्र ठरत आहेत. त्यानुसार कर्मचाऱ्यांना याचा लाभ देण्यासाठी प्रत्येक प्रकरण हे पदोन्नती समिती (Promotion Committee) पुढे ठेवावे लागणार आहे. समिती ने मान्यता दिल्यानंतरच याचा लाभ मिळणार आहे. मात्र यामुळे पुन्हा कर्मचाऱ्यांना वाटच पहावी लागणार आहे. त्यामुळे कालबद्ध पदोन्नतीचा लाभ मिळाला मात्र तो अर्धाच मिळाला, अशी चर्चा महापालिका कर्मचाऱ्यांमध्ये आहे. (Pune Municipal corporation)
काही महापालिका कर्मचाऱ्यांची महापालिकेत बरेच वर्षे सेवा होते. मात्र काही तांत्रिक कारणामुळे त्यांना पदोन्नतीचे पद मिळत नाही. त्यामुळे पद आणि वेतन अशा दोन्ही पासून कर्मचाऱ्याला वंचित राहावे लागत होते. यावर तोडगा काढण्यात आला. त्यानुसार दोन टप्पे करण्यात आले. ज्या कर्मचाऱ्यांची सेवा 12 वर्ष आणि 24 वर्ष पूर्ण झाली असेल, त्यांना त्यांच्या सेवेनुसार वेतनवाढदेण्यात आली. पद तेच असले तरी कर्मचाऱ्यांना वाढीव वेतन मिळू लागले. 1994 साली हा नियम लागू करण्यात आला. यामध्ये 2003 साली सुधारणा करण्यात आली. त्यानंतर 2013 यात आणखी स्पष्टता आणण्यात आली. मग सातव्या वेतन आयोगानुसार सरकार ने 2016 सालापासून दोन ऐवजी तीन टप्पे केले. त्यामध्ये 10 वर्ष, 20 वर्ष आणि 30 वर्ष असे टप्पे करण्यात आले आहेत. त्यानुसार याचा प्रस्ताव महापालिका आयुक्त यांच्या समोर ठेवण्यात आला होता. महापालिका आयुक्तांची स्वाक्षरी झाल्यानंतर याचे तत्काळ परिपत्रक देखील जारी करण्यात आले आहे. (Time Bound Promotion, PMC Pune)
महापालिका प्रशासनाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार कर्मचाऱ्यांना याचा लाभ देण्यासाठी प्रत्येक प्रकरण हे पदोन्नती समिती पुढे ठेवावे लागणार आहे. समिती ने मान्यता दिल्यानंतरच याचा लाभ मिळणार आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना पुन्हा रखडत बसावे लागणार आहे. दरम्यान कर्मचारी संघटनेने मागणी केली होती कि, जी प्रकरणे तत्काळ निकाली निघण्यासारखी आहेत. ज्यात तांत्रिक अडचणी नाहीत, अशा सेवकांना कालबद्ध पदोन्नती चा लाभ देण्यासाठी उपायुक्त, सामान्य प्रशासन यांना अधिकार द्यावेत. संघटनेच्या मागणीनुसार सामान्य प्रशासन विभागाने देखील याला सकारात्मक प्रतिसाद देत प्रस्तावात तसेच नमूद केले होते. मात्र अतिरिक्त आयुक्त आणि आयुक्तांनी यात बदल करत प्रत्येक प्रकरण हे पदोन्नती समिती पुढे आणावे, असे म्हटले आहे. यामुळे कर्मचाऱ्या मध्ये नाराजीचे वातावरण आहे. (PMC pune)
परिपत्रकानुसार तीन लाभांची सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना ही वेतन मेट्रिक्स मधील वेतन स्तर S -२० पर्यंत वेतन घेणाऱ्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना लागू राहिल. या कर्मचाऱ्यांना जेंव्हा S २१ चे वेतन सुरु होईल. तेव्हा कालबद्ध पदोन्नती योजनेचा लाभ त्यांना देता येणार नाही. त्याचप्रमाणे ज्या कर्मचाऱ्यांनी अगोदर १२ आणि २४ च्या योजनेचा लाभ घेतला आहे. त्यांना देखील आता या योजनेचा लाभ मिळण्यासाठी आपली सेवा पूर्ण होईपर्यंत वाट पहावी लागणार आहे. (Pay Matrix s 20)
Circular इथे पहा