Chandrashekhar Bawankule | महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाणून घेतल्या जनतेच्या समस्या
Pune News – (The Karbhari News Service) – महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Revenue Minister Chandrashekhar Bawankule) यांनी विभागीय आयुक्त कार्यालय, विधानभवन येथील झुंबर हॉलमध्ये दुपारी २ ते ४ या वेळेत नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
यावेळी विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, महसूल कर्मचारी संघटना, ग्राम महसूल अधिकारी संघटना, कोतवाल संघटनेचे पदाधिकारी तसेच नागरिक उपस्थित होते.
यावेळी नुकसान भरपाईच्या रकमा, ग्रामपंचायत निधी, शासकीय जमिनी भोगवटा वर्ग १ करणे, आधार कार्ड, जळीत प्रकरणी नुकसान भरपाई अदा करणे, अहिल्यानगर येथे कापूस खरेदी- विक्री केंद्र सुरु करणे, अल्पसंख्याक आयोगाची नियुक्ती करणे, पानशेत पूरग्रस्तांचे पुनर्वसन, गुहागर रत्नागिरी लाईट हाऊस टुरिझम आदी विषयांवर नागरिकांकडून तसेच महसूल कर्मचारी संघटने कडून महसूल विभागाचा आकृतीबंध अद्ययावत करणेबाबत निवेदन सादर करण्यात आले. प्राप्त झालेल्या निवेदनावर मंत्री महोदयांनी शेरे लिहून संबंधित विभागाकडे तात्काळ हस्तांतरित करण्यात आली.
यावेळी नागरिकांना भेटण्याची प्रक्रिया सुलभ होण्यासाठी टोकन पद्धती राबविण्यात आली. शेतकऱ्यांसाठी घेण्यात आलेल्या आकारीपड जमिनींच्या निर्णयाबद्दल अभिनंदन करुन शासनाचे आभार यावेळी नागरिकांकडून मानण्यात आले.
यावेळी विदर्भ, मराठवाडा तसेच पुणे जिल्हा व परिसरातील नागरिक उपस्थित होते.
COMMENTS