पीएमपीएमएल च्या निगडी डेपोतील वाहकाने एका शिफ्टमध्ये आणले विक्रमी उत्पन्न
पीएमपीएमएल च्या निगडी डेपोचे वाहक सुखदेव बाजीराव जाधव यांनी एका शिफ्टमध्ये तिकीट विक्रीतून विक्रमी १९,८६८/- रूपये इतके उत्पन्न आणले. वाहक श्री. सुखदेव जाधव यांनी रविवार, दि. २२ जानेवारी २०२३ रोजी निगडी ते लोणावळा या मार्गावर विक्रमी उत्पन्न आणून उल्लेखनीय कामगिरी केली आहे. पीएमपीएमएल चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक ओम प्रकाश बकोरिया, सहव्यवस्थापकीय संचालिका मा. प्रज्ञा पोतदार-पवार यांनी श्री. सुखदेव जाधव यांनी तिकीट विक्रीतून आणलेल्या विक्रमी उत्पन्नाबद्दल त्यांचे विशेष अभिनंदन केले.
वाहक सुखदेव जाधव हे पीएमपीएमएल मध्ये २००९ पासून कार्यरत आहेत. रविवार, दि. २२ जानेवारी २०२३ रोजी निगडी ते लोणावळा या मार्गावर (सकाळपाळीच्या) एका शिफ्टमध्ये तिकीट विक्रीतून विक्रमी १९,८६८/- रूपये इतके उत्पन्न परिवहन महामंडळास मिळवून दिले. तसेच रविवार, दि. ०१ जानेवारी २०२३ रोजी देखील श्री. सुखदेव बाजीराव जाधव यांनी एका शिफ्टमध्ये तिकीट विक्रीतून विक्रमी १९,१७१/- रूपये इतके उत्पन्न आणले होते.
रविवार, दि. २२ जानेवारी २०२३ रोजी निगडी ते लोणावळा मार्गावर पीएमपीएमएल च्या एकूण १२ बस धावत होत्या. यामध्ये ७ बसेस नियमित शेड्युलच्या व ५ बसेस जादा सोडण्यात आल्या होत्या. या १२ बसेसपैकी एका बसवर सुखदेव जाधव वाहक म्हणून काम करीत होते. त्यांनी त्यांच्या शिफ्टमध्ये बसच्या दोन फेऱ्या केल्या. त्यात त्यांनी १९,८६८/- रुपये इतके विक्रमी उत्पन्न तिकीट विक्रीतून जमा केले. निगडी लोणावळा मार्गावर रविवारी गर्दी असल्यामुळे जास्तीत जास्त प्रवाशांना घेऊन जाण्याचा प्रयत्न श्री. जाधव यांनी केला. त्यामुळेच विक्रमी उत्पन्न आणण्यात यश आल्याचे श्री. जाधव यांनी सांगितले.
———————————————
“पीएमपीएमएलचे वाहक श्री. सुखदेव जाधव यांनी एका शिफ्टमध्ये १९ हजार ८६८ रुपये इतके उत्पन्न परिवहन महामंडळास मिळवून दिले. एका शिफ्टमध्ये एका वाहकाने मिळवून दिलेले पीएमपीएमएलच्या इतिहासातील हे सर्वाधिक उत्पन्न आहे. सुखदेव जाधव यांच्या कामाचे करावे तेवढे कौतुक थोडेच आहे. पीएमपीएमएलचे अध्यक्ष मा. श्री. ओम प्रकाश बकोरिया यांनी उत्पन्न वाढविण्यासाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत. सर्व वाहकांनी असाच प्रतिसाद दिल्यास पीएमपीएमएलच्या दैनंदिन
उत्पन्नात आणखी वाढ होईल.”
– सतिश गव्हाणे, चिफ ट्रान्सपोर्ट मॅनेजर (ऑपरेशन)
Commendable work by our dedicated Conductor Mr Sukhdeo Jadhav of Nigadi Depot of route number-368. He has collected ₹ 19,868 in a shift from Nigadi to Lonavala. This is one of the highest revenue collected in a shift in PMPML history. Great job…..@PMPMLPune pic.twitter.com/FHt5PKa3c2
— Om Prakash Bakoria (@ombakoria) January 22, 2023