MLA Sunil Kamble | आमदार सुनील कांबळे यांचा वानवडी भागात पदयात्रेद्वारा मतदारांशी संवाद

HomeMaharashtra

MLA Sunil Kamble | आमदार सुनील कांबळे यांचा वानवडी भागात पदयात्रेद्वारा मतदारांशी संवाद

Ganesh Kumar Mule Nov 10, 2024 7:14 PM

Maharashtra Cabinet Meeting Decisions |आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय जाणून घ्या
Marathi Bhasha Ani Sanskriti | विशेष लेख – मराठी भाषा आणि संस्कृती यावर अतिक्रमण होते आहे का! – विकास मोहन साळुंके
All Party Meeting | Maratha Aarakshan | मराठा आरक्षणविषयक सर्वपक्षीय बैठकीत एकमुखी ठराव | राज्यात शांतता, कायदा सुव्यवस्था राखण्याचे आवाहन

MLA Sunil Kamble | आमदार सुनील कांबळे यांचा वानवडी भागात पदयात्रेद्वारा मतदारांशी संवाद

Pune Cantonment Assembly – (The Karbhari News Service) – पुणे कॅंटॉन्मेंट विधानसभा मतदारसंघातील भाजप, महायुतीचे उमेदवार आमदार सुनील कांबळे यांनी आज मॉर्निंग वॉक आणि पदयात्रेच्या माध्यमातून मतदारांशी संवाद साधला.  यावेळी मतदारसंघात त्यांनी मागील पाच वर्षात केलेल्या कामाबद्दल माहिती देतानाच आगामी काळातील त्यांच्या व्हीजन विषयी नागरिकांशी चर्चा केली आणि मतदारांच्या यांपेक्षा जाणून घेतल्या. (Pune Election News)

आमदार सुनील कांबळे यांच्या भव्य पदयात्रेला  वानवडी बाजार इथून  सुरुवात झाली.पदयात्रेच्या सुरुवातीस महाराष्ट्रचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि महात्मा ज्योतिबा फुलेंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करीत विनम्र अभिवादन केले.भाजपाचे पुणे शहराचे सरचिटणीस महेश पुंडे व नगरसेविका  कालिंदा  पुंडे यांच्या तसेचं नगरसेवक धनराज घोगरे व  लक्ष्मी घोगरे तसेचं  कोमल शेंडकर व समीर शेंडकर, पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड चे माजी  उपाध्यक्ष सचिन मथुरावाला , दिनेश होले यांच्या द्वारे पदयात्रेचे जंगी स्वागत करण्यात आले.

यावेळी कॅन्टोन्मेंट चे राष्ट्रवादीचे शहर सरचिटणीस दिलीप जांभुळकर, कॅन्टोन्मेंट अध्यक्ष नरेश जाधव, मुनीरभाई सय्यद,  प्रसाद चौघुले, दत्ता जाधव, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे नेते संजय सोनवणे, बाळासाहेब जानराव, नेते महेंद्र कांबळे, संदीप धांडोरे यांच्यासह  महायुतीच्या मित्रपक्षांचे, संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.  वानवडी बाजार येथून सुरू झालेली पदयात्रा शिंदे छत्री रस्ता, अभिनंदन सोसायटी, परमार पार्क, जांभुळकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, वानवडी गाव मार्गे जांभुळकर चौक,  तात्या टोपे सोसायटी, चौगुले नगर, गवळी घाडगे नगर, मनीष दर्शन सोसायटी, पंचरत्न सोसायटी मध्ये गेली आणि  श्रीनाथ मंडळ येथे समारोप झाला.

यावेळी सुनील कांबळे यांनी पुणे मनपा व कँटोन्मेंट हद्दीतील सोडवलेल्या समस्यांची माहिती नागरिकांना दिली,  तसेच विद्युत वाहिन्यांच्या ओव्हरहेड तारा नागरिकांसाठी धोकादायक असल्याने मतदार संघातील अशा धोकादायक तारा भूमिगत करण्याचा कामास सुरुवात झाल्याचेही कांबळे यांनी सांगितले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0