Cabinet Meeting Decisions | मंगळवार ०४ जुलै रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय (संक्षिप्त)
(Cabinet Meeting Decisions) मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर आज मंत्रिमंडळाची बैठक झाली. यामध्ये काही महत्वाचे निर्णय झाले आहेत. (Cabinet Meeting Decisions)
राज्याचे ग्रीन हायड्रोजन धोरण जाहीर. देशातील महाराष्ट्र हे पहिले राज्य. नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पांना मोठे प्रोत्साहन
( ऊर्जा विभाग)
* मराठा, कुणबी विद्यार्थ्यांना परदेशी उच्च शिक्षणासाठी सयाजीराव गायकवाड – सारथी शिष्यवृत्ती योजना. ७५ विद्यार्थ्यांना दरवर्षी शिष्यवृत्ती
(नियोजन विभाग)
• दिंडोरी तालुक्यातील चिमणपाडा आणि त्र्यंबक तालुक्यातील कळमुस्ते येथील प्रवाही वळण योजनांना मान्यता
(जलसंपदा विभाग)
• नागपूर येथील मे.शिवराज फाईन आर्ट लिथो वर्क्सच्या कर्मचाऱ्यांना शासन सेवेत सामावून घेणार
(उद्योग विभाग)
• सेवानिवृत्त मुख्य न्यायमूर्ती, न्यायमूर्ती किंवा त्यांचे पती, पत्नी यांना सेवानिवृत्तीनंतरचे लाभ
(विधि व न्याय विभाग)
• सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली, गेळे आणि चौकुळ येथील कबूलायतदार गावकर जमिनीबाबत निर्णय.
(महसूल विभाग)
• नागपूर कृषि महाविद्यालय येथे आंतरराष्ट्रीय कृषि सुविधा केंद्र
(कृषि विभाग)
• मत्स्यबीज उत्पादन आणि मत्स्यबीज संवर्धन केंद्रांचा भाडेपट्टी कालावधी वाढवून आता २५ वर्षे
(पदुम विभाग)
—
News Title | Cabinet meeting Decisions | The decision in the Cabinet meeting held on Tuesday 4th July