“खोट बोल पण रेटून बोल ” ही भाजपची प्रवृत्ती
: राष्ट्रवादी शहर अध्यक्ष प्रशांत जगताप
पुणे : जलसंपदा विभागाच्या एका कनिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्याचा पत्राचा संदर्भ देत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पाण्याचे राजकारण करू पाहत आहेत. पुण्यात कुठलीही पाणी कपात करण्यात आलेली नाही. जलसंपदामंत्री जयंतराव पाटील यांच्या खुलाश्यानंतर महापौर मुरलीधर मोहोळ यांनी या प्रकरणातून माघार घेत असल्याचे जाहीर केले. खर बघायला गेलं तर भारतीय जनता पार्टीच्या देश पातळीवरील नेत्यांपासून सर्वांचीच “खोट बोल पण रेटून बोल ” ही प्रवृत्ती असून पुणेकर या प्रवृत्तीला येत्या काळात निश्चितच धडा शिकवतील. असा टोला राष्ट्रवादी शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी लगावला आहे.
: पाणी कपात नाही : जयंत पाटील
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या सूचनेनुसार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पुणे शहरातील प्रतिनिधींसोबत जलसंपदा मंत्री .जयंत पाटील यांनी सिंचन भवन येथे आज ४.०० वाजता बैठक आयोजित केली होती. या बैठकी दरम्यान राष्ट्रवादी शिष्टमंडळाने बाबतचे निवेदन जलसंपदा मंत्र्यांना दिले असता .पाटील म्हणाले की, “अश्या प्रकारची कुठलीही पाणी कपात करण्यात आलेले नाही किंवा राज्य सरकार अश्या प्रकारच्या विचाराधीन नाही. गेल्या ५ वर्षात फडणवीस सरकारच्या काळात देखील तब्बल ११ वेळा अश्या प्रकारचे पत्र जलसंपदा विभागाकडून महानगरपालिकेला पाठवण्यात आली होती तसेच फडणवीस सरकारने एक महिना 180 mld क्षमतेचा एक पंप बंद ठेवत पुणेकरांवर पाणी कपात लादली होती. आम्ही मात्र कुठल्याही प्रकारच्या पाणी कपातीचा निर्णय घेतलेला नसून पुणे व पिंपरी चिंचवड या महानगरांच्या भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेता भविष्यात रिसायकलिंगद्वारे तसेच पश्चिम घाटातील पाणी या महानगरांकडे वळवण्याच्या विचाराधीन आहोत.”
महापौर मुरलीधर मोहोळ यांनी या प्रकरणातून माघार घेतली : जगताप
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष .प्रशांत जगताप म्हणाले की, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी गेल्या १७ वर्षाच्या पालकमंत्री पदाच्या काळात कधीही पाणी कमी पडू दिले नाही, परंतु केवळ अधिकारी स्तरावरील एका पत्राचा आधार घेत देवेंद्र फडणवीस पाण्याचे राजकारण करू पाहत आहे. या शहराच्या पाणी व्यवस्थापनात नेहमीच आदरणीयअजितदादांनी पुणे शहराचा नव्याने होणारा विस्तार विचारात घेत पाणी व्यवस्थापन करण्यात आले.एवढेच नाही तर या पाण्याव्यतिरिक्त भामा-आसखेड प्रकल्पातील २.५ TMC पाणी अजितदादांमुळे पुणे शहरास मिळाले. गेल्या ५ वर्षांच्या काळात पुणेकरांनी मोठ्या विश्वासाने भाजपच्या हातात महानगरपालिकेची सत्ता दिली मात्र देशात,राज्यात सत्ता असूनही फडणवीसांना पुणे शहरासाठी काहीही करता न आल्याने पाणी प्रश्नाआडून महापालिकेचे राजकारण फडणवीस करू पाहत आहेत.विशेष म्हणजे यात देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्याच्या एक दिवस अगोदर अश्या प्रकारचे पत्र बाहेर येणे हे सुद्धा संशयास्पद आहे. जलसंपदामंत्री नामदार जयंतराव पाटील साहेबांच्या या खुलाश्यानंतर महापौर मुरलीधर मोहोळ यांनी या प्रकरणातून माघार घेत असल्याचे जाहीर केले. खर बघायला गेलं तर भारतीय जनता पार्टीच्या देश पातळीवरील नेत्यांपासून सर्वांचीच “खोट बोल पण रेटून बोल ” ही प्रवृत्ती असून पुणेकर या प्रवृत्तीला येत्या काळात निश्चितच धडा शिकवतील.
या शिष्टमंडळात आमदार चेतन तुपे,आमदार सुनील टिंगरे,विरोधीपक्षनेत्या दिपालीताई धुमाळ, जयदेवराव गायकवाड, रविंद्र माळवदकर, देशमुख आदी उपस्थित होते.
COMMENTS