एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला भाजपचा पाठिंबा
पुणे: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) कर्मचाऱ्यांच्या संपाला शहर भाजपचे अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी स्वारगेट येथील आगारात जाऊन पाठिंबा दिला.
मुळीक म्हणाले, राज्यातील अकार्यक्षम महाविकास आघाडी सरकार केवळ आणि केवळ वसुली आणि अधिकाऱ्यांच्या बदल्यांमधील भ्रष्टाचारात गुंतलेले आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांमध्ये सरकारला अजिबात स्वारस्य राहिलेले नाही. एसटी कर्मचाऱ्यांची आर्थिक स्थिती कोलमडण्यास महाविकास आघाडी सरकारच जबाबदार आहे.
मुळीक पुढे म्हणाले, गेल्या तीन-चार महिन्यांपासून राज्यातील एक लाखांहून अधिक कर्मचार्यांचे पगार झालेले नाही. साडेतीनशे कर्मचार्यांचा कोरोनाच्या काळात मृत्यू झाला. आजपर्यंत राज्याच्या विविध भागांमध्ये ३५ कर्मचार्यांनी आत्महत्या केल्या. परंतु सरकारला याचे गांभीर्य नाही. केवळ आर्यन खान आणि नवाब मलिकांच्या जावयाला निर्दोष ठरविण्यासाठी महाविकास आघाडी सरकार दिवस-रात्र कार्यरत असल्याची राज्यातील नागरिकांची भावना झालेली आहे. शासनाने तातडीने एसटी कर्मचार्यांचे प्रश्न सोडवावेत अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील.
COMMENTS