BJP Vs Congress | भेदभावाचे बीज पेरणं, हे केवळ अयोग्यच नव्हे तर अशोभनीय | कॉंग्रेस कडून भाजपला सल्ला 

HomeBreaking News

BJP Vs Congress | भेदभावाचे बीज पेरणं, हे केवळ अयोग्यच नव्हे तर अशोभनीय | कॉंग्रेस कडून भाजपला सल्ला 

Ganesh Kumar Mule May 09, 2025 5:58 PM

Haryana Election Results | हरियाणात भाजपची हॅट्रिक! | कसबा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीकडून विजयाचा मोठा जल्लोष!
Pune : NCP Vs BJP : पुणे राष्ट्रवादी कॉंग्रेसची भाजपच्या विरोधात प्रतीकात्मक होळी
Chandigarh Mayor Election 2022: भाजपा की सरबजीत कौर बनीं चंडीगढ़ की मेयर : AAP उम्मीदवार को 1 वोट से हराया 

BJP Vs Congress | भेदभावाचे बीज पेरणं, हे केवळ अयोग्यच नव्हे तर अशोभनीय | कॉंग्रेस कडून भाजपला सल्ला

 

IND PAK War – (The Karbhari News Service) – राजकारण करताना वेळ काळ आणि मर्यादा याचे पालन करणे गरजेचे असतं. भेदभावाचे बीज पेरणं, हे केवळ अयोग्यच नव्हे तर अशोभनीय आहे. अशा शब्दात महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस चे सरचिटणीस प्रथमेश आबनावे यांनी भाजपला सल्ला दिला आहे. (Pune News)

पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी कॉंग्रेस चा कालखंड आणि भाजपचा कालखंड यावरून पोस्ट केली होती. त्याला आबनावे यांनी उत्तर दिले आहे.

आबनावे यांनी म्हटले आहे कि, सीमेपलीकडून युद्धाचे सावट गडद होत असताना, देश एकतेच्या धाग्यांनी विणला जातोय… आणि अशा नाजूक क्षणी, पुण्याच्या भूमीतून राजकारण , वातावरण दूषित केलं जातं, हे खरोखरच क्लेशदायक आहे.

केंद्रीय मंत्रिपदाच्या शपथेसोबत जबाबदारीची जाणही लाभावी, ही सहज अपेक्षा. मात्र परिस्थितीचं गांभीर्य दुर्लक्षित करून मतभेदांच्या राखेत वैयक्तिक स्वार्थाची ठिणगी टाकणं, ही नीतिमत्तेची नव्हे तर संवेदनशीलतेचीही घोर विफलता आहे.

आज देशासाठी सीमा सजग आहे, संसद एकमताने सज्ज आहे, आणि जनतेच्या मनात राष्ट्रप्रेमाची ज्वाळा प्रज्वलित आहे. अशा वेळी भेदभावाचे बीज पेरणं, हे केवळ अयोग्यच नव्हे तर अशोभनीय आहे.

या पार्श्वभूमीवर अटलजींच्या कालातीत शब्दांची आठवण अनिवार्य आहे, असे आबनावे यांनी म्हटले आहे.

> “सरकारें आएंगी, जाएंगी।
पार्टियाँ बनेंगी, बिगड़ेंगी।
ये देश रहना चाहिए,
इस देश का लोकतंत्र अमर रहना चाहिए!”
— अटल बिहारी वाजपेयी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: