Traffic Mamagement | गणेश विसर्जन निमित्त वाहतुकीत मोठा बदल | महत्वाच्या कामासाठी बाहेर पडताना सावधान

HomeपुणेBreaking News

Traffic Mamagement | गणेश विसर्जन निमित्त वाहतुकीत मोठा बदल | महत्वाच्या कामासाठी बाहेर पडताना सावधान

Ganesh Kumar Mule Sep 08, 2022 3:39 PM

Deep Work – Book by Cal Newport | या पुस्तकाचा अभ्यास करा आणि अधिक यश प्राप्त करा 
Palkhi Sohala 2023 Update| पालखी सोहळ्यात केंद्र सरकारच्या ९ वर्षांच्या कामाची माहिती 
Water Cut | पुणेकरांना एक दिवसाआड पाणी? | बुधवारच्या कालवा समितीच्या बैठकीत होणार निर्णय

गणेश विसर्जन निमित्त वाहतुकीत मोठा बदल | महत्वाच्या कामासाठी बाहेर पडताना सावधान

शुक्रवार दि. 9 सप्टेंबर रोजी असणार्‍या अनंत चतुर्दशी/गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी दोन वर्षाच्या ब्रेकनंतर या वर्षी पुणे शहरात गर्दीचा उच्चांक होण्याचा अंदाज आहे. तसेच मिरवणूक शनिवारी (10 सप्टेंबर) दुपारी उशिरा पर्यन्त चालू असण्याची शक्यता आहे. त्यामुळे ट्राफिक मध्ये काही बदल करण्यात आले आहेत.

गुरुवार संध्याकाळी 7 नंतर लक्ष्मी रोड, कुमठेकर रोड, टिळक रोड, केळकर रोड (नारायण पेठ) यांना जोडणाऱ्या सर्व गल्ल्या बांबू लावून बंद करायला सुरुवात होईल. तसेच जंगली महाराज रोड, FC रोड, नळ स्टॉप पासून डेक्कन पर्यंतचा कर्वे रोड, नदी पात्रातील रस्ता आज जॅम असणार आहे.