Bhumi Green Energy | देवाची उरुळी येथे ५०० टन कचरा प्रक्रियेसाठी महापालिकेचा ५७८ कोटींचा ठेका | भूमी ग्रीन एनर्जी एनव्हारोकेअर एलएलपी या संस्थेची निवड

Homeadministrative

Bhumi Green Energy | देवाची उरुळी येथे ५०० टन कचरा प्रक्रियेसाठी महापालिकेचा ५७८ कोटींचा ठेका | भूमी ग्रीन एनर्जी एनव्हारोकेअर एलएलपी या संस्थेची निवड

Ganesh Kumar Mule Aug 14, 2026 8:41 PM

PMC Solid Waste Management Department Tender | घनकचरा विभागाच्या निविदा प्रक्रियेत ठेकेदाराने खोटी कागदपत्रे लावल्याचा पिपल्स युनियन पार्टीचा आरोप! 
PMC Solid Waste Management | आता रविवारी देखील स्वच्छतेच्या कामांना सुट्टी नाही | उपायुक्त संदीप कदम यांचे सर्व क्षेत्रीय कार्यालयांना आदेश 
First Waste to hydrogen plant in India |  पुणे नगर निगम (PMC) को हाइड्रोजन प्लांट के लिए केंद्र और राज्य सरकार से चाहिए फंड! 

Bhumi Green Energy | देवाची उरुळी येथे ५०० टन कचरा प्रक्रियेसाठी महापालिकेचा ५७८ कोटींचा ठेका | भूमी ग्रीन एनर्जी एनव्हारोकेअर एलएलपी या संस्थेची निवड

 | १५ वर्षे काम, आणखी पाच वर्षे मुदतवाढीची तरतूद

 

Shrinath Bhimale PMC – (The Karbhari News Service) –  पुणे महापालिका हद्दीत दररोज निर्माण होणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी तब्बल ५७७ कोटी ९६ लाख रुपयांचा ठेका देण्याचा प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समितीसमोर ठेवला होता. देवाची उरुळी कचरा डेपो येथे दररोज ५०० मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया करणारा एकात्मिक ओला-सुका कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या कामासाठी सर्वांत कमी दर देणाऱ्या भूमी ग्रीन एनर्जी एनव्हारोकेअर एलएलपी या संस्थेची निवड करण्यात आल्याचे समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी सांगितले. (PMC Standing Committee)

महापालिकेने या प्रकल्पासाठी जूनमध्ये निविदा मागविली होती. त्यासाठी दोन निविदा प्राप्त झाल्या असून दोन्ही निविदाकार पात्र ठरले. भूमी ग्रीन एनर्जीने प्रतिटन ७७२ रुपये, तर अँटनी लारा एन्व्हायरो सोल्यूशन्स प्रा. लि.ने प्रतिटन १ हजार ४५ रुपये दर सादर केला. त्यामुळे भूमी ग्रीन एनर्जीचा दर सर्वांत कमी असल्याने त्यांची निवड करण्यात आली. या दरावर दरवर्षी सात टक्के दरवाढ लागू होणार आहे. निविदा १५ वर्षांसाठी असून आणखी पाच वर्षे मुदतवाढीची तरतूद आहे.

प्रस्तावित प्रकल्पात दररोज ३०० मेट्रिक टन ओल्या आणि २०० मेट्रिक टन सुक्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात येणार आहे. प्रकल्प उभारणीसाठी देवाची उरुळी कचरा डेपो येथील सुमारे १२ एकर जागा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. कचरा प्रक्रियेबरोबरच प्रकल्पाचे संचालन आणि देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी संबंधित संस्थेवर राहणार आहे.

या कामासाठी प्रत्यक्ष प्रक्रिया केलेल्या कचऱ्याच्या प्रमाणानुसार देयके अदा करण्यात येणार आहेत. प्रशासनाने हा खर्च महसुली अत्यावश्यक स्वरूपाचा असल्याचे नमूद केले आहे. संबंधित अर्थशीर्षकावर उपलब्ध असलेली सात कोटी ५० लाख रुपयांची तरतूद अपुरी पडणार असल्याने पुढील काळात आवश्यक निधी वर्गीकरणाद्वारे उपलब्ध करून देण्याचे प्रस्तावित आहे.

निविदा शिफारस समितीने ४ ऑगस्ट रोजी भूमी ग्रीन एनर्जीच्या दराची शिफारस केली असून, हे दर प्रचलित बाजारभावाशी सुसंगत असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.

| कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी ने केला विरोध 

दरम्यान या प्रस्तावाला कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी ने विरोध केला. कॉंग्रेस चे प्रशांत जगताप यांनी विरोधाच्या भूमिकेवर ठाम राहत या प्रस्तावाच्या विरोधात मतदान केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वैशाली बनकर,  सुहास टिंगरे यांनीही या प्रस्तावाच्या विरोधात मतदान केले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: