Yogesh Tilekar : OBC Reservation : पवारांची मर्जी राखण्यासाठीच ओबीसी आरक्षणासाठी भुजबळ आग्रही नाहीत  : भाजपाचे ओबीसी  आघाडीचे अध्यक्ष योगेश टिळेकर यांचा आरोप

HomeBreaking Newsपुणे

Yogesh Tilekar : OBC Reservation : पवारांची मर्जी राखण्यासाठीच ओबीसी आरक्षणासाठी भुजबळ आग्रही नाहीत  : भाजपाचे ओबीसी  आघाडीचे अध्यक्ष योगेश टिळेकर यांचा आरोप

Ganesh Kumar Mule Dec 10, 2021 1:14 PM

Local body Election : ओबीसी प्रवर्गाच्या जागा अनारक्षित करून 18 जानेवारीला मतदान
OBC Reservation : Chandrakant Patil : ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होऊ देणार नाही : भाजपा प्रदेशाध्यक्ष  चंद्रकांतदादा पाटील यांचा इशारा
PMC Election 2022 | महापालिका निवडणुकीचे आरक्षण जाहीर  | बऱ्याच प्रस्थापित नगरसेवकांना धक्का 

पवारांची मर्जी राखण्यासाठीच ओबीसी आरक्षणासाठी भुजबळ आग्रही नाहीत

: भाजपाचे ओबीसी  आघाडीचे अध्यक्ष योगेश टिळेकर यांचा आरोप

पुणे : राज्य सरकारने मागासवर्गीय आयोगाला निधी देऊन इम्पिरिकल डेटा तातडीने गोळा करण्यासाठीआक्रमक भूमिका घेण्याऐवजी ओबीसींचे नेते म्हणवून घेणारे छगन भुजबळ हेराष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची मर्जी राखण्यासाठीच ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी आग्रही भूमिका घेतनाहीत, असा आरोप भारतीय जनता पार्टीचे ओबीसी  आघाडीचे प्रदेश अध्यक्ष योगेश टिळेकर यांनी केला आहे. ओबीसी समाजाच्या राजकीय अस्तित्वाची भुजबळांना खरंच चिंताअसेल तर त्यांनी राज्य सरकारला मागासवर्गीय आयोगाला तातडीने निधी देण्यासाठी भाग पाडावे, अशी मागणीही टिळेकर  यांनी केली.

टिळेकर  यांनी म्हटले आहे की, सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांमधीलओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द केलेले नाही. आरक्षणाचे प्रमाण ठरविण्यासाठीमागासवर्गीय आयोगाकडून इम्पिरिकल डेटा गोळा करण्याची अट सर्वोच्च न्यायालयाने घातलीआहे. राज्य मागासवर्गीय आयोगाला निधी देण्यासाठी राज्य सरकार गंभीर नाही , हे वारंवार दिसून येत आहे. राज्य सरकारमधील सरंजामी प्रवृत्तींना ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण देण्याची इच्छाच नसल्याने मागासवर्गीय आयोगाला निधी मिळण्यात विलंबहोत आहे. ओबीसी समाजाचे नेते म्हणविणारे छगन भुजबळ यांनी  या सरंजामी प्रवृत्तींपुढे लोटांगण घातले असल्याने त्यांनी या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेणे सोडून मूग गिळून गप्प राहणे पसंत केलेआहे.  राज्य सरकारला मागासवर्गीय आयोगास निधी देण्याकरिता भाग पाडण्याऐवजी भुजबळ हे केंद्रसरकारने इम्पिरिकल डेटा द्यावा , अशी भूमिकाघेऊन या विषयाला आणखी फाटे फोडण्याचा प्रयत्न करीत आहेत.सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर आघाडी सरकारने तातडीने मागासवर्गीय आयोगाला निधी उपलब्ध करून दिला असता तर इम्पिरिकल डेटा गोळाही झाला असता.

आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळेच  नगरपंचायतींच्या निवडणुकीत ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण मिळू शकलेनाही . आघाडी सरकार असेच निष्क्रीय राहिले तर आगामी काळात होणाऱ्या महापालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकीतही ओबीसी समाजाला आरक्षण मिळू शकणार नाही, असेही टिळेकर   यांनी पत्रकात नमूद केले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0