Barshi People in Pune | पुणे, पिंपरी-चिंचवडमधील बार्शीकरांचा कौटुंबिक मेळावा संपन्न 

HomeBreaking Newsपुणे

Barshi People in Pune | पुणे, पिंपरी-चिंचवडमधील बार्शीकरांचा कौटुंबिक मेळावा संपन्न 

गणेश मुळे Mar 03, 2024 2:09 PM

Flyovers and Subways in Maharashtra | महाराष्ट्रातील ९ रेल्वे उड्डाणपुलांचे लोकार्पण आणि ११ उड्डाणपूल आणि भुयारी मार्गांचे भूमिपूजन
Scheme for Farmers | शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी ‘गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना’ राबविण्यास मान्यता
Maharashtra Flood | उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील पूरपरिस्थितीचा आढावा

Barshi People in Pune | पुणे, पिंपरी-चिंचवडमधील बार्शीकरांचा कौटुंबिक मेळावा संपन्न

 

Pune – (The Karbhari News Service ) – Barshi People in Pune | पिंपरी चिंचवड आणि पुणे शहरातील बार्शीकर नागरिकांनी एकत्र आले पाहिजे, या हेतूने स्थापन करण्यात आलेल्या बार्शी मित्र मंडळाचा स्नेहमेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

आचार्य अत्रे रंगमंदिर, पिंपरी येथे झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आयुष्मान भारत योजनेचे राज्य प्रमुख ओमप्रकाश शेटे होते. यावेळी बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत (MLA Rajendra Raut Barshi), धाराशिव लोकसभेचे खासदार ओमराजे निंबाळकर (Dharashiv MP Om Raje Nimbalkar), माजी मंत्री दिलीपराव सोपल (Dilip Sopal Barshi), माजी आमदार विलास लांडे, माजी महापौर माई ढोरे, भाजपचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष शंकर जगताप, ज्येष्ठ पत्रकार राजा माने, वैरागचे उपनगराध्यक्ष निरंजन भूमकर, युवा उद्योजक अमोल पाटील, मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष वृक्षमित्र अरुण पवार, उपमुख्यमंत्री कार्यालयाचे विशेष कार्यकारी अधिकारी शरद घावटे, वित्तविभाग झारखंडचे सहसचिव रमेश घोलप, महापालिकेचे उपायुक्त रविकिरण घोडके, उद्योजक अजय करंडे, माजी नगरसेवक शिवाजी पाटोळे, माजी नगरसेवक संतोष जाधव, मंडळाचे अध्यक्ष ॲड. अतुल पाटील, कार्याध्यक्ष ॲड. दिपक बोधले, तसेच पुणे व पिंपरी-चिंचवडमधील बार्शीकर अधिकारी, उद्योजक व व्यवसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान, ह.भ.प. ॲड. जयवंत बोधले महाराज यांना ‘जीवनगौरव’, आंतरराष्ट्रीय टेनिसपट्टू प्रार्थना ठोंबरे यांना ‘बार्शीभूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळाचे अध्यक्ष ॲड. अतुल पाटील यांनी, तर आभार कार्याध्यक्ष ॲड. दीपक बोधले यांनी मानले. स्नेहमेळावा यशस्वी करण्यासाठी सर्व कार्यकारिणी सदस्य व मार्गदर्शक मंडळाने सहकार्य केले.

मेळाव्याला येणाऱ्या सर्व बार्शीकरांना मोफत आयुष्मान भारत योजनेचे कार्ड देण्यात आले. बार्शीकरांची अद्यावत डिरेक्टरी तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले असून, डिरेक्टरीबाबत अधिक माहितीसाठी ॲड. अतुल पाटील यांना ९९६०१९१७३३ व अशोक नाना घावटे यांना ९६२३२३५४५४ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.