MLA Chetan Tupe | रिक्षा चालकांवरील गुन्हे तातडीने मागे घ्या    | आमदार चेतन विठ्ठल तुपे यांची विधानसभेत आग्रही भूमिका

HomeBreaking Newssocial

MLA Chetan Tupe | रिक्षा चालकांवरील गुन्हे तातडीने मागे घ्या | आमदार चेतन विठ्ठल तुपे यांची विधानसभेत आग्रही भूमिका

Ganesh Kumar Mule Mar 17, 2023 2:26 PM

Teacher Day | सरकारी शाळांचे सक्षमीकरण, आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण यावर भर देणार- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Mahatma Phule Jan Arogya Yojana | महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत सर्पदंश आणि अपेंडिक्स या आजारांचा समावेश करणार
Pune PMC 32 Villages Committee | समाविष्ट 32 गावांच्या लोकप्रतिनिधींच्या समितीत अजून तीन सदस्य  | जाणून घ्या नवीन सदस्य  

रिक्षा चालकांवरील गुन्हे तातडीने मागे घ्या

| आमदार चेतन विठ्ठल तुपे यांची विधानसभेत आग्रही भूमिका

हडपसर चे दमदार आमदार चेतन विठ्ठल तुपे पाटील यांनी रिक्षा चालकांवर आंदोलनामुळे दाखल असलेले गुन्हे तातडीने मागे घेण्यात यावेत अशी आग्रही भूमिका घेतली आहे.

रिक्षा चालकांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करणार अशी घोषणा सरकारने केली. ही चांगली बाब आहे पण काही दिवसांपूर्वी पुण्यातील रिक्षाचालकांनी बाईक टॅक्सी विरोधात आंदोलन केले होते. ते गुन्हे आधी मागे घ्यावेत अशी मागणी त्यांनी विधानसभेत केली. कल्याणकारी मंडळ स्थापन करतांना आत्ता रिक्षा चालकांची त्यांच्या कुटुंबीयांची जी स्थिती आहे ती सुधारण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे तुपे यांनी म्हटले आहे.