Ayushman Bharat Card | वृक्षमित्र अरुण पवार यांच्या वतीने पावणेपाच हजार नागरीकांना आयुष्मान भारत कार्ड वाटपास सुरुवात

HomeBreaking Newsपुणे

Ayushman Bharat Card | वृक्षमित्र अरुण पवार यांच्या वतीने पावणेपाच हजार नागरीकांना आयुष्मान भारत कार्ड वाटपास सुरुवात

कारभारी वृत्तसेवा Dec 14, 2023 5:20 AM

Marathwada Muktisangram | नितीन चिलवंत यांचा एकनाथ पवार व अरुण पवार यांच्या हस्ते सत्कार
Arun Pawar : Marathwada Janvikas Sangh : समाजसेवा व पर्यावरणाबाबत अरुण पवार यांचे कार्य अतुलनीय : ह.भ.प. शिवाजी मोरे
Marathwada Muktisangram | Tree Plantation | मराठवाडा चॅरीटेबल ट्रस्ट एकसंघ समितीच्या वतीने भंडारा डोंगरावर 500 रोपांचे संरक्षक जाळीसह वृक्षारोपण

Ayushman Bharat Card | वृक्षमित्र अरुण पवार यांच्या वतीने पावणेपाच हजार नागरीकांना आयुष्मान भारत कार्ड वाटपास सुरुवात

Ayushman Bharat Card | आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या आयुष्मान भारत मिशन अंतर्गत पिंपळे गुरव येथील मराठवाडा जनविकास संघाचे (Marathwada  Janvikas Sangh) संस्थापक अध्यक्ष वृक्षमित्र अरुण पवार (Arun Pawar) यांच्या वतीने चार हजार सातशे नागरिकांना आयुष्मान भारत आरोग्य कार्ड (Ayushmann Bharat Card) वाटपास नुकतीच सुरुवात सुरुवात करण्यात आली. दरम्यान, या सेवेबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

पिंपळे गुरव येथील भालचिम सभागृहात आयोजित कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) शहराध्यक्ष अजित गव्हाणे, माजी नगरसेवक राजेंद्र जगताप, शेंद्रियशेती तज्ञ मा , दिलीपराव देशमुख बारडकर माजी नगरसेविका उषाताई मुंढे, कामगार नेते विश्वनाथ शिंदे, सह्याद्री संस्थेचे अध्यक्ष कृष्णा भालचिम, डी. बी. घोडे, किसनराव गभाले, गुलाब हिले, गोविंद पोटे, करवंदे गुरुजी, विष्णू शेळके, सूर्यकांत कुरुलकर, वामन भरगंडे, सखाराम वाळकोळी, नागेश जाधव आदी मान्यवरांच्या उपस्थितीत या कार्डचे वाटप करण्यात आले.

यावेळी बोलताना अजित गव्हाणे म्हणाले, की अशा योजनेंतर्गत कुटुंबाला पाच लाख रुपयांपर्यंत आरोग्य कवच मिळत आहे. याचा लाभ कुटुंबातील एक किंवा सर्व सदस्य घेऊ शकतात. या योजनेत एक हजार २०९ शस्त्रक्रिया, चिकित्सा, उपचार उपचारांचा समावेश करण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यात ५७ खासगी आणि १२ सरकारी अशा एकूण ६९ रुग्णालयांचा समावेश आहे. असे उपक्रम राबविणे ही काळाची गरज असून, मराठवाडा जनविकास संघाने घेतलेला हा उपक्रम स्तुत्य आहे.

अरुण पवार म्हणाले, की आज सर्वसामान्य कुटुंबाना रुग्णालयाचा खर्च परवडेनासा झालेला आहे. त्यामुळे केंद्र शासनाने सुरू केलेला हा उपक्रम नागरिकांना फायदेशीर ठरत आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बळीराम माळी सर यांनी, तर आभार सूर्यकांत कुरुलकर यांनी मानले.