Ashish Yerekar IAS | PMPML | पीएमपीच्या सीएमडी पदी आशिष येरेकर यांची नियुक्ती | वर्षभरात तिसऱ्यांदा पीएमपीएमएलचा कारभारी बदलला

HomeBreaking Newsपुणे

Ashish Yerekar IAS | PMPML | पीएमपीच्या सीएमडी पदी आशिष येरेकर यांची नियुक्ती | वर्षभरात तिसऱ्यांदा पीएमपीएमएलचा कारभारी बदलला

गणेश मुळे Jul 01, 2024 3:40 PM

PMPML Employees Diwali Bonus | पीएमपी कर्मचाऱ्यांच्या खात्यात दिवाळी बोनस जमा | The Karbhari ने उचलून धरला होता विषय
PMPML Retired Employees | पीएमपी मधील सेवानिवृत्त सेवक उद्यापासून करणार आंदोलन | जाणून घ्या कारण
Good News For PMPML Employees | पीएमपी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू | डिसेंबर च्या वेतनात फरकाची ५०% रक्कम जमा केली जाणार

Ashish Yerekar IAS | PMPML | पीएमपीच्या सीएमडी पदी आशिष येरेकर यांची नियुक्ती | वर्षभरात तिसऱ्यांदा पीएमपीएमएलचा कारभारी बदलला

 

PMPML CMD – (The Karbhari News Service) – पीएमपीच्या सीएमडी (PMPML CMD)  पदी आशिष येरेकर (Ashish Yerekar IAS)  यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य सरकारकडून याबाबतचे आदेश नुकतेच जारी करण्यात आले आहेत. (PMPML Pune)

 

पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरांना एकत्रितपणे सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था देण्यासाठी २००७ साली पीएमपीएमएल या कंपनीची स्थापना करण्यात आली. आजही या दोन्ही शहरांत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था देणारी ती एकमेव यंत्रणा आहे. मात्र वर्षभरात तीन अध्यक्ष बदलण्यात आले आहेत.

लक्ष्मीनारायण मिश्रा यांची बदली केल्यानंतर संजय कोलते यांना या पदावर नियुक्त करण्यात आले होते. त्यांची देखील आता बदली करण्यात आली आहे. नवीन अध्यक्ष आता आशिष येरेकर असतील. येरेकर हे अहमदनगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते.

———

सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर वाढावा यासाठी ती सक्षम केली जाईल असे सभा संमेलनांमध्ये ओरडून ओरडून सांगणारे राज्यकर्ते प्रत्यक्षात मात्र याच्या विरुद्ध वागतात हा गेल्या १७ वर्षांतील अनुभव आहे. या १७ वर्षांत या कंपनीच्या प्रमुखपदी २१ माणसे येऊन गेली. आज २२ व्या माणसाची नियुक्ती करणारा आदेश काढला गेला आहे. गेल्या एक वर्षांतील ही तिसरी वेळ आहे , गतिमान सरकार या शब्दाचा हा अर्थ आहे हे आत्ता कळतंय पुणेकरांना.

विवेक वेलणकर, अध्यक्ष सजग नागरिक मंच, पुणे