Recruitment in PMC : महापालिकेत रिक्त पदे भरण्याबाबत विविध विभागांची अनास्था! : तीन महिने झाले तरी आवश्यक पदांची माहिती दिली नाही 

HomeBreaking Newsपुणे

Recruitment in PMC : महापालिकेत रिक्त पदे भरण्याबाबत विविध विभागांची अनास्था! : तीन महिने झाले तरी आवश्यक पदांची माहिती दिली नाही 

Ganesh Kumar Mule Apr 19, 2022 2:53 AM

Lahuji Vastad Salve Memorial : लहुजी वस्ताद साळवे स्मारकाचा मार्ग मोकळा!
PMC : Irrigation : महापालिकेसोबत नेहमीच पत्रयुद्ध खेळणारे पाटबंधारे आता साधणार समन्वय! 
Ti Bus Toilet : Standing Committee : ‘ती’ बस मधील स्वच्छतागृह महिलांसाठी मोफतच!  : स्थायी समितेन आपला निर्णय पुन्हा बदलला 

महापालिकेत रिक्त पदे भरण्याबाबत विविध विभागांची अनास्था!

: तीन महिने झाले तरी आवश्यक पदांची माहिती दिली नाही

पुणे : महापालिकेत पदभरती करण्यावर राज्य सरकार कडून निर्बंध लागू करण्यात आले होते. वेतनावरील खर्च नियंत्रित करण्यासाठी राज्य सरकारने 2 जून 2015 पासून हे निर्बंध लागू केले होते.  त्यामुळे महापालिकेतील विभिन्न विभागातील भरती प्रक्रिया रखडली होती. त्याचा ताण प्रशासकीय यंत्रणेवर जाणवत होता. मात्र सरकारने आता हे निर्बंध हटवले आहेत. नुकतेच सरकारने याबाबतचे आदेश जारी केले आहेत. त्यामुळे महापालिकेत पदभरती करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यानुसार महापालिका प्रशासनाने देखील याबाबत हालचाली सुरु केल्या होत्या. सर्व विभागाकडून रिक्त पदाबाबत माहिती मागवली होती. मात्र तीन महिने उलटूनही अजून काही विभागांनी माहिती दिलेली नाही. खात्यांच्या या अनास्थेमुळे यावर कार्यवाही करण्यास उशीर होत आहे. त्यामुळे अजून एकदा ही माहिती सामान्य प्रशासन विभागाने सर्व खात्याकडून मागवली आहे.

: रिक्त पदे भरण्यास राज्य सरकारची मंजुरी

 वेतनावरील खर्च नियंत्रित करण्याच्या हेतूने राज्य सरकारने जून 2015 सालापासून महापालिकेतील भरती प्रक्रियेवर निर्बंध लागू केले होते. मात्र सरकारने आता हे निर्बंध हटवले आहेत. नुकतेच सरकारने याबाबतचे आदेश जारी केले आहेत. त्यामुळे महापालिकेत पदभरती करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र महापालिकेच्या एकूण वित्तीय खर्चाच्या 35% खर्चातच ही प्रक्रिया करण्यास सांगण्यात आले आहे. भरती कडे डोळे लावून बसणाऱ्या लोकांना याचा फायदा होणार आहे.

: 2015 पासून पदभरती नाही

महापालिकेत पदभरती करण्यावर राज्य सरकार कडून निर्बंध लागू करण्यात आले होते. वेतनावरील खर्च नियंत्रित करण्यासाठी राज्य सरकारने 2 जून 2015 पासून हे निर्बंध लागू केले होते.  त्यामुळे महापालिकेतील विभिन्न विभागातील भरती प्रक्रिया रखडली होती. त्याचा ताण प्रशासकीय यंत्रणेवर जाणवत होता. त्यामुळे महापालिका प्रशासनाकडून  राज्य सरकारला भरती प्रक्रियेस मान्यता देण्यासाठी वारंवार पत्रव्यवहार केला जात होता. मात्र राज्य सरकारकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नव्हता. याचा महापालिका कामकाजावर परिणाम दिसत होता. त्यामुळे महापालिका कंत्राटी कर्मचाऱ्यांची भरती करताना दिसून येत होती. दरम्यान कोविड च्या काळात महापालिकेला अत्यावश्यक अशा आरोग्य कर्मचाऱ्यांची निकड भासत होती. त्यामुळे पालिकेने ही पदे भरण्यासाठी सरकारला विनंती केली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यात लक्ष घालून याला मंजुरी दिली होती. त्यानुसार भरती करण्यात आली. मात्र इतर विभागात भरतीला मंजुरी नव्हती. मात्र आता हे निर्बंध हटवण्यात आले आहेत. सरकारने भरतीचा मार्ग मोकळा केला आहे.

: लवकरच होऊ शकते पदभरती

सरकारच्या आदेशानुसार वित्त विभागाच्या दि.०२ जून,२०१५ च्या शासन निर्णयान्वये वेतनावरील खर्च नियंत्रित करण्याच्या अनुषंगाने विविध निबंध लागू करण्यात आले होते. त्या अनुषंगाने राज्यातील महानगरपालिकांच्या आस्थापनेवरील पदभरती स्थगित होती. तथापि, या पत्रान्वये महानगरपालिकांच्या आस्थापनेवरील सरळसेवेने विविध पदे भरण्यास मान्यता देण्यात येत आहे. पदभरती करताना महानगरपालिकेच्या आर्थिक परिस्थितीचा आढावा घेऊन प्रशासकीय खर्च ३५ टक्के मर्यादेच्या आत राहील याबाबत संबंधित आयुक्तांनी दक्षता घेऊन त्यानंतरच पदभरती करावी. या निर्णयाने भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान पुणे महापालिका ही पदभरती प्रक्रिया निवडणूक झाल्यानंतरच लागू करणार होती. मात्र आता निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. शिवाय महापालिकेत सेवकांची आवश्यकता आहे. त्यामुळे लवकरच ही प्रक्रिया केली जाऊ शकते. अशी माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली.

: २७ डिसेंबर ला मागवली होती माहिती

राज्य शासनाच्या अदेशानंतर सामान्य प्रशासन विभागाने २७ डिसेंबर ला सर्व खात्याकडून माहिती मागवली होती. त्यानुसार  महाराष्ट्र शासन यांनी महानगरपालिका आस्थापनेवरील विविध पदे सरळसेवेने भरण्यास मान्यता दिलेली आहे. पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवर सरळसेवेने पदभरती करणेसाठी संवर्गनिहाय बिंदुनामावली नोंदवह्या तपासून घेणे गरजेचे आहे . तसेच पुणे महानगरपालिकेच्या वेगवेगळ्या विभागांना कुठल्या पदांची
आवश्यकता आहे त्याची माहिती घेऊन सरळसेवेने भरती प्रक्रिया राबविणे आवश्यक आहे. त्यानुषंगाने पुणे महानगरपालिकेच्या विवध विभागांनी मे. महाराष्ट्र शासन यांनी मान्यता दिलेल्या आकृतीबंधानुसार आपले विभागासाठी संवर्गनिहाय सरळसेवेने भरती करावयाच्या पदांबाबत पुढीलप्रमाणे
विहित नमुन्यात माहिती asthapanainfo@gmail.com या इमेलवर सॉफ्ट कॉपी (Excel File Font – Arial ms Unicode font Size – 12 मध्ये ) तसेच उप आयुक्त, सामान्य प्रशासन विभाग यांचेकडे हार्ड
कॉपीमध्ये या कार्यालयीन परिपत्रकाच्या दिनांकापासून आठ दिवसांत सादर करावी. मात्र तीन महिने उलटून गेले तरी ही माहिती मिळालेली नाही.

: पुन्हा एकदा माहिती मागवावी लागली

महापालिकेत पदभरती करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यानुसार महापालिका प्रशासनाने देखील याबाबत हालचाली सुरु केल्या होत्या. सर्व विभागाकडून रिक्त पदाबाबत माहिती मागवली होती. मात्र तीन महिने उलटूनही अजून काही विभागांनी माहिती दिलेली नाही. खात्यांच्या या अनास्थेमुळे यावर कार्यवाही करण्यास उशीर होत आहे. त्यामुळे अजून एकदा ही माहिती सामान्य प्रशासन विभागाने सर्व खात्याकडून मागवली आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 1