Annasaheb Waghire College Otur | ओतूर महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.सुदंरराव ढाकणे यांचा सेवापूर्ती गौरव समारंभ साजरा

HomeBreaking Newsपुणे

Annasaheb Waghire College Otur | ओतूर महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.सुदंरराव ढाकणे यांचा सेवापूर्ती गौरव समारंभ साजरा

Ganesh Kumar Mule Jun 25, 2023 3:29 PM

Organic Farming | lभविष्यात सेंद्रिय शेतीच माणसाला तारणार | योगेश मनसुख | अण्णासाहेब वाघीरे महाविद्यालयात उभारला गांडूळ खत प्रकल्प
Waghire College | वाघिरे महाविद्यालयाच्या पदार्थ विज्ञान विभागातील माजी विद्यार्थ्यांचा  स्नेहमेळावा संपन्न 
Annasaheb Waghire College | A Grade | अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालयास A मानांकन | नॅक कमिटीची भेट

Annasaheb Waghire College Otur | ओतूर महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.सुदंरराव ढाकणे यांचा सेवापूर्ती गौरव समारंभ साजरा

Annasaheb Waghire College Otur | पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या (Pune District Education Association) अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालय, ओतूर (Annasaheb Waghire Collège Otur) या ठिकाणी १९८८ पासून आज पर्यंत ३५ वर्ष वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये विज्ञान शाखेत  पदार्थ विज्ञान विभागात कार्यरत असणारे डॉ सुंदरराव ढाकणे  (Dr Sundarrao Dhakne) हे आपल्या नियत वयोमानानुसार ३० जून २०२३ रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यानिमित्त त्यांचा सपत्निक सेवापूर्ती गौरव समारंभ महाविद्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आला अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अभय खंडागळे व सेवक कल्याण समितीचे समन्वयक डॉ. ए.एम.बिबे यांनी दिली. (Annasaheb Waghire College Otur)
सदर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर, अहमदनगर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे व एम.फुक्टो चे अध्यक्ष डॉ.एस.पी लवांडे सर ओतूर ग्रामपंचायतचे सरपंच मा.प्रशांत डुंबरे, उपसरपंच रईस मणियार, डॉ.एस डी.अघाव,  श्री नामदेव सांगळे आदी मान्यवर उपस्थित होते.
सदर कार्यक्रमामध्ये महाविद्यालयाच्यावतीने डॉ. सुंदरराव ढाकणे  यांना ३५ वर्षाच्या सेवेबद्दल महाविद्यालयाच्या वतीने सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. सदर प्रसंगी सन्मानपत्राचे वाचन डॉ.डी.एम टिळेकर यांनी केले.
 सदर कार्यक्रमामध्ये  प्रमुख पाहुणे डॉ.पंडित विद्यासागर सरांनी आपल्या मनोगतामध्ये डॉ. ढाकणे सरांनी महाविद्यालयामध्ये गुणवत्ता वाढीसाठी राबवलेल्या विविध उपक्रमांचा उल्लेख करून त्यांना सेवानिवृत्ती नंतरच्या भावी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या. याचबरोबर नवीन शैक्षणिक धोरणानुसार शिक्षकांच्या बदलत्या व महत्त्वपूर्ण भूमिकेबद्दल ही त्यांनी आपले विचार मांडले. शिक्षण म्हणजे  विद्यार्थ्यांचें ज्ञान व क्षमतांचा विकास करणे होय असे मत त्यांनी व्यक्त केले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संदीप सांगळे यांनी आपल्या भाषणात डॉ ढाकणे त्यांनी  लहानपणाच्या हालाखीच्या कौटुंबिक परिस्थितीतून कशाप्रकारे आपले शिक्षण पूर्ण करत स्वतःचा व महाविद्यालयाच्या विकासामध्ये आपले बहुमोल योगदान दिले याबाबत मत व्यक्त केले.  डॉ.एस. पी.लवांडे यांनी आपल्या मनोगतामध्ये डॉ.ढाकणे यांना भावी आयुष्याबद्दल शुभेच्छा देत असतानाच आपला महाविद्यालयातील उपप्राचार्य पदाचा प्रदीर्घ अनुभव तसेच पदार्थ विज्ञानातील आपल्या ज्ञानाचा फायदा  चिंचोली या आपल्या मूळ गावी असणाऱ्या ग्रामीण भागातील जनतेला जास्तीत जास्त व्हावा यासाठी प्रयत्न करावेत असे मत व्यक्त केले.  आपल्या अध्यक्ष मनोगतामध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अभय खंडागळे यांनी डॉ.ढाकणे यांच्या काम करण्याच्या सचोटीबद्दल तसेच मीतभाशी स्वभावाबद्दल आवर्जून उल्लेख केला. तसेच त्यांनी त्यांच्या सेवा काळामध्ये पदार्थ विज्ञान विभागामध्ये पदव्युत्तर पदवी तसेच संशोधन केंद्र सुरू करणे महाविद्यालयांमध्ये यू.जी.सी रुसा या सारख्या विविध योजना राबवण्यासाठी केलेले प्रयत्न तसेच नॅक मुल्यांकनामध्ये आय.क्यू.एस.सी समन्वयक म्हणून गेली अनेक वर्ष केलेल्या कामाबद्दल  गौरव उद्गार काढले. तसेच सदर प्रसंगी प्रा.आंद्रे मॅडम, प्रा.बाळासाहेब हाडवळे, डॉ. निलेश हांडे, डॉ.हरिभाऊ बोराटे, डॉ उमेशराज पनेरु,  डॉ.रमाकांत कस्पटे, प्रा.महेश गंभीर, श्री.हेमंत डुंबरे तसेच माजी विद्यार्थी प्रथमेश पडवळ व श्रीमती प्रतिभा डुंबरे, डॉ.ढाकणे यांचे चिरंजीव अभिजित ढाकणे यांनी आपली मनोगते व्यक्त केली.
सदर कार्यक्रमासाठी ढाकणे यांच्या पत्नी सौ.संगीता ढाकणे मुलगा अभिजित व मुलगी आरती  तसेच त्यांचे मित्र व नातेवाईक, ओतूर येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य डॉ.व्ही.एम शिंदे व  आभार प्रदर्शन उपप्राचार्य डॉ.के. डी सोनावणे यांनी तर सूत्रसंचालन डॉ.अमोल बिबे यांनी केले.
सदर कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी  डॉ.वसंतराव गावडे, डॉ दत्तात्रेय टिळेकर, डॉ निलेश काळे, डॉ अनिल लोंढे, डॉ विनायक कुंडलीक  तसेच श्री. मिलिंद ढगे व श्री.जयसिंग डुंबरे यांनी विशेष परिश्रम घेतले.
——
News Title | Annasaheb Waghire College Otur |  Otoor College Vice Principal Dr.Sudanarrao Dhakne’s service completion ceremony celebrated