Amit Shah on Sharad Pawar | ५८ वर्षांत तुम्ही गरिबांसाठी काय केलं | अमित शाह यांचा काँग्रेस ला सवाल | शरद पवारांना दिली भ्रष्टाचाऱ्यांचे सरदार अशी उपमा

HomeBreaking Newsपुणे

Amit Shah on Sharad Pawar | ५८ वर्षांत तुम्ही गरिबांसाठी काय केलं | अमित शाह यांचा काँग्रेस ला सवाल | शरद पवारांना दिली भ्रष्टाचाऱ्यांचे सरदार अशी उपमा

गणेश मुळे Jul 21, 2024 1:42 PM

Amit Shah : PMC : गृहमंत्री अमित शाह रविवारी पुणे महापालिकेत : छत्रपती शिवरायांच्या पुतळा स्मारकाचे भूमिपूजन तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे होणार लोकार्पण
BJP Vs NCP – Sharadchandra Pawar | महाराष्ट्राला दिलेला १०.५ लाख कोटी रुपये निधीचा लेखाजोखा मुरलीधर मोहोळ यांनी मांडावा  | शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांचा जोरदार प्रहार
Home Minister Amit Shah | देवेंद्र फडणवीस व अमित शहांनी माफी मागून राजीनामा द्यावा : प्रशांत जगताप

Amit Shah on Sharad Pawar | ५८ वर्षांत तुम्ही गरिबांसाठी काय केलं | अमित शाह यांचा काँग्रेस ला सवाल | शरद पवारांना दिली भ्रष्टाचाऱ्यांचे सरदार अशी उपमा

Amit Shah On Congress – (The Karbhari News Service) – शरद पवार (Sharad Pawar) हे  भ्रष्टाचाऱ्यांचे सरदार आहेत, असा आरोप अमित शाह (Amit Shah) यांनी केला.  यावेळी अमित शाह यांना काँग्रेसवरही (Congress) निशाणा साधला. ते म्हणाले की, काँग्रेसवाले खूप अपप्रचार करत आहेत. आम्ही गरीब, दलित, आदिवासींचं कल्याण करणार, असं काँग्रेसकडून सांगण्यात येत आहे. मात्र मी आज हे विचारायला आलो आहे की,   ५८ वर्षांपर्यंत तुमची सत्ता होती. या काळात तुम्ही गरिबांसाठी काय केलं. महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दाखवलेल्या मार्गावर चालणं दूर राहिलं. यांनी त्यांचे विचार समाप्त करण्याचं काम केलं. दहा वर्षांमध्ये गरीबांचं कल्याण करण्याचं काम हे भारतीय जनता पक्षानं केलं आहे, असं अमित शाह म्हणाले. (BJP Adhiveshan Pune)

भाजपच्या राज्यस्तरीय अधिवेशनात शाह बोलत होते. यावेळी त्यांनी विरोधकांवर सडकून टीका केली. 

सध्या राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा हा चांगलाच तापलेला आहे. त्या पार्श्वभूमीवर अमित शाह यांनी मराठा आरक्षणावरून शरद पवार यांना लक्ष्य केलं. ते म्हणाले की, महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी वेगवेगळे संभ्रम पसरवण्यास सुरुवात केली आहे. मी आज शरद पवार यांना विचारू इच्छितो की, आमच्याकडून देवेंद्र फडणवीस, अजित पवार, एकनाथ शिंदे सर्वजण बोलत आहेत. आता मी एक निरीक्षण नोंदवू इच्छितो, जेव्हा जेव्हा भाजपाचं सरकार येतं तेव्हा मराठा समाजाला आरक्षण दिलं जातं. मात्र जेव्हा जेव्हा शरद पवार सत्तेवर येतात तेव्हा मराठा आरक्षण गायब होतं, असं अमित शाह म्हणाले.

आरक्षणाच्या मुद्द्यावर भूमिक मांडताना अमित शाह यांनी सांगितलं की, मागच्या काही काळात खूप भ्रम पसरवले गेले. भाजप आरक्षण संपविणार असे सांगितले गेले. आम्ही उत्तर देण्यामध्ये संकोच करू लागलो. लोकांच्या मनात शंका निर्माण झाली. मात्र आज मी सांगू इच्छितो की, आरक्षणाला १० वर्षांची मुदतवाढ ही नरेंद्र मोदींचं पूर्ण बहुमताचं सरकार असतानाच दिली गेली. तसेच आरक्षणाला बळ देण्याचं कामही नरेंद्र मोदी यांनी केलं.

 

शहा म्हणाले, देशसुरक्षेसाठी आम्ही प्राधान्य दिले आहे. येत्या दोन वर्षात देश नक्षलवादापासून मुक्त होईल. आतंकवाद मुळापासून काढला आहे.  देशाच्या सुरक्षेला औरंगाबाद फॅन क्लब करू शकत नाही. आघाडीवाले फॅन क्लब आहे. त्यांचे नेता उद्धव ठाकरे आहेत. कसाबला बिर्याणी खाऊ घालणाऱ्यासोबत ते बसत आहेत. संभाजीनगरला विरोध करताता त्या़च्याजवळ ते बसतात. लाज वाटली पाहिजे. हे सुरक्षित करू शकत नाहीत.

 

देशाला पुन्हा दाखवून द्या आणि महाराष्ट्रात भाजपला विजयी करा. इतिहासातील सर्वात मोठा विजय येथे होईल. महाराष्ट्रात शरद पवारांना विचारतो की, केंद्रात, राज्यात दहा वर्षे तुमचे सरकार होते. तुम्ही खोटे आश्वासन‌ दिले. बाकी काहीच दिले नाही.  दहा वर्षात १० हजार ५ कोटी रूपये महाराष्ट्राला दिले आहेत. त्यांनी काहीच केले नाही. रस्ते ७५ कोटी, रेल्वे २ लाख कोटी दिले. १ लाख कोटी मुंबई बुलेट ट्रेन केले. ११ हजार कोटींचा पालखी मार्ग केला. पवारांनी कसला विकास केला. पवारांनी दहा वर्षे कृषी मंत्री होते. मी दीड मिनिटांत साखर कारखान्यांचे काम केले. लाडकी बहिण योजना आली. पवार साहेब म्हणातात नवीन काय. पण तुम्ही का नाही केले. पुन्हा भाजपची सरकार येईल.

मी अनेक जयपराजय पाहिले आहेत. पण जिंकल्यावर अहंकार येतो. राहुल गांधी हे हरल्यानंतर अहंकारी बनले आहेत. जनतेने मोदींच्या कामावर मोहोर लावली आहे. म्हणून तर मोदी विजयी झाले. आपल्या २४० जागा आल्या.  अजून थोडी कसर राहिली आहे, आता ती भरून काढू. विधानसभेला पुन्हा भगवा फडकावू.  देशाचे सरकार भाजपच बनवेल हे जनतेने ठरवले आहे. म्हणून तिसऱ्यांदा आपले सरकार आले असल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले.