Alandi Nagar Parishad | आळंदी शहरास भामा आसखेड वरून मिळणाऱ्या पाण्याचा फ्लो वाढवून देण्याची नगरपरिषदेची पुणे महापालिकेकडे मागणी 

HomeBreaking Newsपुणे

Alandi Nagar Parishad | आळंदी शहरास भामा आसखेड वरून मिळणाऱ्या पाण्याचा फ्लो वाढवून देण्याची नगरपरिषदेची पुणे महापालिकेकडे मागणी 

गणेश मुळे Feb 13, 2024 3:49 PM

Balkadu Cartoon Exhibition | MLA Ravindra Dhangekar | बाळासाहेबांच्या विचारांचे बाळकडू राजकारण्यांसाठी गरजेचे | आमदार रवींद्र धंगेकर
Hemant Rasane | Pune Lok Sabha | पुण्यात हेमंत रासने यांच्याकडून होणार 370 किलो पेढे वाटप! कसबा मतदारसंघात भाजपाकडून विजयोत्सवाची जोरदार तयारी
PMC Pune Hindi News |  डीपी के अनुसार पुणे शहर में सड़कों के चौड़ीकरण करने की आबा बागुल की मांग

Alandi Nagar Parishad | आळंदी शहरास भामा आसखेड वरून मिळणाऱ्या पाण्याचा फ्लो वाढवून देण्याची नगरपरिषदेची पुणे महापालिकेकडे मागणी

Alandi Nagar Parishad | आळंदी शहरास (Alandi City) पुणे महानगरपालिकेच्या (Pune Municipal Corporation (PMC) भामा आसखेड प्रकल्पामधून (Bhama Askhed Project) कुरळी येथील केंद्रावरून पाणी पुरवठा केला जातो. सद्यस्थितीत शहरास एक दिवस आड याप्रमाणे पाणी पुरवठा केला जातो. शहरास मिळणाऱ्या पाण्याचा फ्लो खूपच कमी असल्याने सम खाली गेल्याने पंपिंग वारंवार बंद करावे लागते व जलटाक्या भरण्यास उशीर हातो. यामुळे शहराच्या संपूर्ण पाणी वितरणावर परिणाम होत आहे. त्यामुळे शहरास होणाऱ्या पाण्याचा फ्लो वाढवून मिळावा. अशी मागणी आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी कैलास केंद्रे (Alandi Nagar parishad CEO Kailas Kendra) यांनी पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार (Vikram Kumar PMC Commissioner) यांच्याकडे केली आहे.
आळंदी नगरपरिषदेच्या पत्रानुसार आळंदी नगरपरिषदेने मागील आठवड्यात पुणे महानगरपालिकेच्या सूचनेनुसार क्रोनीमार्शल कंपनाचा फ्लो मीटरी (जलमापक) बसवून घेतला आहे. यामध्ये शहरास होणारा पाणीपुरवठा ३१४ ते ३१५ m3/h यानुसार होतो आहे. शहरास २४ तासात ७ ते ७.५ mld पाणी (Raw Water) मिळत आहे. पाण्याचा फ्लो कमी असल्याने वारंवार सम खाली जाऊन पंपिंग बंद करावे लागत आहे. त्यामुळे संपूर्ण शहराच्या पाणी वितरणावर परिणाम झाला आहे. सद्यस्थितीत शहरास तीन ते चार दिवसातून एकदा किमान १ तास यानुसार पाणी पुरवठा होत आहे. परिणामी शहराची पाणी पुरवठा योजना विस्कळीत झाली असून आळंदी शहराच्या नागरीकांच्या व पदाधिकाऱ्यांच्या प्रत्यक्ष स्वरूपात रोजच्या रोज इकडील कार्यालयात तक्रारी प्राप्त होत आहे.
आळंदी नगरपरिषद ही ” क” वर्ग नगरपरिषद असून नगरपरिषदेची अर्थिक स्थिती बिकट आहे. नगरपरिषद स्वनिधीमधुन पुणे महानगरपालिकेच्या भामा आसखेड योजनेची पाणी देयके अदा केली जातात. सद्यस्थितीत नगरपरिषद निधीत उपलब्ध निधीची कमतरता असल्याने मागील काही महिन्यांपासूनची देयके अदा करणेस अडचणी येत आहेत. तरी नगरपरिषद निधी उपलब्ध होईल त्यानुसार थकीत देयके लवकरात लवकर अदा करण्यासाठी प्रयत्नरत आहे. थकीत देयकातील  २०,५१,८६१/- रुपयांचा चेक नुकताच देण्यात आला आहे. त्यामुळे शहरास किमान दिवसाआड पाणी पुरवठा करता यावा याकरिता फ्लो वाढवून मिळावा. अशी मागणी नगरपरिषदेच्या वतीने करण्यात आली आहे.