Aapla Dawakhana Yojana PMC Pune | पुणे महापालिका 58 ठिकाणी सुरु करणार ‘आपला दवाखाना’ योजना

HomeBreaking Newsपुणे

Aapla Dawakhana Yojana PMC Pune | पुणे महापालिका 58 ठिकाणी सुरु करणार ‘आपला दवाखाना’ योजना

गणेश मुळे Feb 08, 2024 2:39 AM

PMC Health Department | सहाय्यक आरोग्य अधिकाऱ्यांच्या कामकाजात बदल! | शहरी गरीब, CHS चे कामकाज डॉ वावरे यांच्याकडे, PCPNDT, एमटीपी डॉ बळिवंत यांना तर डॉ जाधव यांच्याकडील NUHM डॉ नाईक यांच्याकडे
PMC Health Department | कायाकल्प प्रकल्पात पुणे महानगरपलिका सर्वोत्कृष्ट
PMC Ranking | PMC Pune Health Schemes | आरोग्य योजनांमध्ये पुणे महापालिकेची रँकिंग 4 थ्या वरून 3 ऱ्या स्थानावर

Aapla Dawakhana Yojana PMC Pune | पुणे महापालिका 58 ठिकाणी सुरु करणार ‘आपला दवाखाना’ योजना 

| पहिल्या टप्प्यात 45 ठिकाणी दिली जाणार सेवा 

 

Aapla Dawakhana Yojana PMC Pune | एकनाथ शिंदे सरकारने (Eknath Shinde Government) मुंबईसह राज्यभरात ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ (Balasaheb Thackeray Aapla Dawakhana) ही योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रात 700 दवाखाने सुरू केले जाणार आहेत. त्याच धर्तीवर पुणे शहरात 58 ठिकाणी दवाखाने सुरु केली जाणार आहेत. त्यापैकी पहिल्या टप्प्यात 45 ठिकाणे आरोग्य विभागाकडून (PMC Health Department) निश्चित करण्यात आली आहेत. अशी माहिती सहायक आरोग्य अधिकारी डॉ वैशाली जाधव (Dr Vaishali Jadhav PMC) यांनी दिली. (Pune Municipal Corporation (PMC) 

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 19 जानेवारीला मुंबईत अशा 20 दवाखान्यांचं लोकार्पण करण्यात आलं. यापूर्वी ऑक्टोबर 2022 मध्ये मुंबईत एकूण 52 ठिकाणी ‘आपला दवाखाना’ अंतर्गत आरोग्य सेवा सुरू करण्यात आली आहे. (Pune PMC News)

काय आहे ‘आपला दवाखाना’ योजना?

 

‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ ही मुंबई महानगरपालिका आणि शिंदे सरकारची नवीन आरोग्य योजना आहे. सध्यातरी ठाणे आणि मुंबई शहरात आपला दवाखाना अंतर्गत आरोग्य सुविधा दिल्या जात आहेत.

आगामी काळात राज्यभरात असे 700 दवाखाने सुरू करण्यात येतील असं आश्वासन शिंदे सरकारने दिलं आहे.

मुंबईसह राज्यभरातील महापालिका आणि सरकारी हॉस्पिटलमध्ये रुग्णांची प्रचंड गर्दी दिसून येते. अगदी ताप,सर्दी अशा आजारांसाठीही रुग्णांना उपचार आणि वैद्यकीय टेस्ट करण्यासाठी घरापासून दूर हॉस्पिटल गाठावे लागते.

यावर उपाय म्हणून दर 25 ते 30 हजार वस्तीनजीक ‘आपला दवाखाना’ असावा असं लक्ष्य आहे.

– पुणे महापालिकेकडून 45 जागा निश्चित

पुणे शहर जुनी आणि नवी हद्द मिळून 58 दवाखाने उभारले जाणार आहेत. सरकारने यासाठी जागा भाडे तत्वावर घेण्यास सांगितले आहे. यात खाजगी जागांचा देखील समावेश आहे. या दवाखान्यात सरकारकडून एक क्लिनिकल सर्जन दिला जाणार आहे. इतर कर्मचारी हे महापालिकेला नेमावे लागतील. त्यानुसार आरोग्य विभागाने 45 जागा शोधून त्याबाबतचा प्रस्ताव मालमत्ता विभागाकडे ठेवला आहे. मालमत्ता विभाग त्याचे भाडे ठरवून देणार आहे. मात्र खाजगी जागा भाड्याने घेण्यावरून काही तांत्रिक अडचणी निर्माण होत आहेत त्यामुळे हा प्रस्ताव पुढे जाऊ शकला नाही.

राज्य सरकारच्या मार्गदर्शनानुसार आम्ही पहिल्या टप्प्यात जागा 45 निश्चित केल्या आहेत. याबाबतचा प्रस्ताव आम्ही मालमत्ता व्यवस्थापन विभागासमोर ठेवला आहे.

डॉ वैशाली जाधव, सहायक आरोग्य अधिकारी 

आपला दवाखाना योजना शहरात चांगल्या पद्धतीने राबवली जाईल. यातील तांत्रिक अडचणी सोडवण्यासाठी आरोग्य विभाग आणि मालमत्ता व्यवस्थापन विभागाची बैठक घेतली जाणार आहे. लवकरच ही योजना कार्यान्वित होईल.

विकास ढाकणे, अतिरिक्त महापालिका आयुक्त