Noncommunicable Diseases | डायबेटीस, उच्च रक्तदाब, कर्करोग अशा रोगांबाबत महापालिका आरोग्य विभाग दक्ष!
| NCD पोर्टल वर १० लाखाहून अधिक लोकांची भरण्यात आली माहिती
NCD Portal – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागांतर्गत (PMC Health Department) शासनाच्या मार्गदर्शक सूचनांन्वये राष्ट्रीय आरोग्य अभियान राबविले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून असंसर्गजन्य आजार एनसीडी (Noncommunicable Diseases Data Portal) कार्यक्रम राबवला जात आहे. यात प्रामुख्याने मधुमेग (Diabetes), उच्च रक्तदाब (Hypertension), कर्करोग (Oral Cancer, Breast Cancer, Cervical Cancer) अशा रोगांचा समावेश आहे. यात पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून नागरिकांची तपासणी करून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. तसेच याबाबत जनजागृती केली जात आहे. या वर्षात १० लाखाहून अधिक लोकांची माहिती पोर्टल वर भरण्यात आली आहे. तर जवळपास २ लाख लोकांची तपासणी करण्यात आली आहे. अशी माहिती सहायक आरोग अधिकारी डॉ वैशाली जाधव (Dr Vaishali Jadhav PMC) यांनी दिली. (Pune Municipal Corporation – PMC)
याबाबत डॉ जाधव यांनी सांगितले कि, पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागांतर्गत शासनाच्या मार्गदर्शक सूचनांन्वये राष्ट्रीय आरोग्य अभियान राबविले जात आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आरोग्य विषयक विविध उपक्रम राबविण्यात येतात. पुणे महानगरपालिकेच्या सर्व UCHC /UPHC मार्फत उपक्रमांची यशस्वीरीत्या अंमलबजावणी केली जाते. एन.सी.डी उपक्रम आपल्या लोकसंख्येच्या सेवेत अत्यंत महत्त्वाचा निरीक्षणाचा आवश्यक भाग असल्याने, महाराष्ट्र सरकार द्वारे नियोजित केलेल्या असंसर्गजन्य आजार (एनसीडी) विषयक पोर्टलचा वापर करण्याची सूचना दिली आहे सर्व UPHC आणि UCHC यांना दि. १ एप्रिल २०२४ पासून असंसर्गजन्य रोग (एनसीडी) पोर्टलचा वापर सुरू करण्याबाबत सूचित केले आहे. पुणे महानगरपालिका कार्यक्षेत्रात १९ UCHC व ५८ UPHC असून एकूण ८९ वैद्यकीय अधिकारी व २८६ परिचारिका कार्यरत आहेत. मार्च २०२४ मध्ये ८९ वैद्यकीय अधिकारी व २८६ परिचारिका यांचे एनसीडी व एनसीडी पोर्टल चे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. एनसीडी पोर्टल व एनसीडी अॅप वापरासाठी १९ UCHC व ५८ UPHC या आरोग्य संस्थामधील वैद्यकीय अधिकारी, एएनएम, आशा कार्यकर्ती यांचे Subcenter ( कार्यक्षेत्राचे नाव), Subcenter User (सर्वेक्षण करण्याच्या एएनएम चे नाव), Village (कार्यक्षेत्रातील सर्वेक्षण करण्यात येणाऱ्या (pockets) भागाचे नाव), ASHA (आशा कार्यकर्ती यांचे नाव ) या प्रकारे मॅपिंग पूर्ण करण्यात आले आहे. मॅपिंग पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष एएनएम, आशा कार्यकर्ती यांनी त्यांना नेमून दिलेले कार्यक्षेत्र व pockets चे सर्वेक्षण करून c-back फॉर्म भरणे आवश्यक आहे तसेच on treatment रुग्णांचा follow up घेणे व त्याची नोंद करणे आवश्यक आहे याबाबत सूचना सर्व आरोग्य संस्थाना वेळवेळी देण्यात आल्या आहेत.
फेब्रुवारी २०२५ पासून “कर्करोग तपासणी व जनजागृती मोहिम राबविणेबाबत राज्य शासनाकडून सूचित करणेत आले. त्यासंदर्भात पुणे महानगरपालिका स्तरावर दिनांक १४ फेब्रुवारी २०२५ पासून “कर्करोग तपासणी व जनजागृती मोहिम” राबविणेबाबत प्राप्त मार्गदर्शक सूचनेनुसार सूचना- देण्यात आल्या “कर्करोग तपासणी व जनजागृती मोहिम” अधिक यशस्वीपणे पुणे महानगरपालिका स्तरावर राबविणेकरिता सर्व क्षेत्रिय कार्यालय स्तरावरून क्षेत्रिय वैद्यकीय अधिकारी व
क्षेत्रिय परिचारिका यांची सदर उपक्रमाचे नोडल अधिकारी म्हणून नेमणूक करणेत आली. तसेच कर्करोग तपासणीकामी दैनंदिन अहवाल अपडेट करणेसाठी गूगल शिट तयार करून तो आरोग्य संस्थांना पाठविण्यात आला व तो रोजच्या रोज भरून घेतला जात आहे.
१४ फेब्रुवारी ते १५ मार्च पर्यंत I SHARE FOUNDATION व पुणे महानगरपालिका यांचे द्वारे पुणे महानगरपालिकेच्या १८ आरोग्य संस्थांमध्ये वय वर्षे ३० ते ६० महिला (गरोदर स्त्रिया व गर्भाशय काढून टाकले आहे अशा स्त्रिया सोडून ) CERVICAL CANCER SCREENING : ORAL CANCER व BREAST CANCER तपासणी करणेसाठी शिबिरांचे आयोजन करण्यात आले. सर्व महा. सहाय्यक आयुक्त पुणे महानगरपालिका तसेच सर्व खतेप्रमुख पुणे महानगरपालिका व सर्व परीमंडळ वैद्यकीय अधिकारी, सर्व क्षेत्रिय वैद्यकीय अधिकारी, सर्व वैद्यकीय अधिकारी व निवासी वैद्यकीय अधिकारी सर्व uchc /uphc यांना अवगत करणेत आले. २० फेब्रुवारी २०२५ ते ३१ मार्च २०२५ पर्यंत “कर्करोग तपासणी व जनजागृती मोहिम” Intencified Special NCD Screening Drive राबविणेबाबत आले.
डॉ जाधव यांनी पुढे सांगितले कि, फेब्रुवारी पासून पोर्टल वर लाख ८६ हजार नागरिकांची माहिती भरण्यात आली. यामध्ये ३० वर्षावरील ६ लाख २१ हजार नागरिकांचा समावेश होता. यात उच्च रक्तदाब (Hypertension) असणारे १ लाख ३ हजार ३७४ नागरिकांची तपासणी झाली. त्यापैकी ३ हजार ७१५ लोकांना उपचारासाठी कमला नेहरू हॉस्पिटल सहित महापालिकेच्या विविध हॉस्पिटलमध्ये मध्ये पाठवण्यात आले. मधुमेह असणारे ७५ हजार ७५ नागरिकांची तपासणी करण्यात आली. तर २ हजार १६५ लोकांना उपचारासाठी पाठवण्यात आले. तोंडाचा कर्करोग असणाऱ्या ६५१३० नागरिकांची तपासणी झाली. तसेच ब्रेस्ट कॅन्सर २६३५१ नागरिकांची आणि सर्व्हायकल कॅन्सर बाबत ३११६ लोकांची तपासणी करण्यात आली. याबाबत अजून तपासणी सुरु आहे. या नागरिकांना देखील उपचारासाठी पाठवले जाणार आहे.
असंसर्गजन्य रोगांबाबत नागरिकांनी महापालिका कर्मचाऱ्यांना सहकार्य करून तपासणी करून घेणे आवश्यक आहे. शिवाय त्याची गंभीर दखल घेत त्यावर उपचार आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घेणे आवश्यक आहे.
- डॉ वैशाली जाधव, सहायक आरोग्य अधिकारी.
COMMENTS