AAP Vijay Kumbhar | पिंपरी चिंचवडमध्ये ‘आप’स्वबळावर लढणार व महापौर बसणार : विजय कुंभार

HomeBreaking News

AAP Vijay Kumbhar | पिंपरी चिंचवडमध्ये ‘आप’स्वबळावर लढणार व महापौर बसणार : विजय कुंभार

Ganesh Kumar Mule Jul 19, 2025 6:18 PM

PMPML | Bonus | पीएमपीच्या कायम आणि बदली कर्मचाऱ्यांना बोनस देण्याची मागणी | कर्मचारी संघटना आक्रमक
PCMC to Nigdi Pune Metro | पुणे मेट्रोच्या PCMC ते निगडी मार्गाचे काम ३ वर्षात पूर्ण करण्याचे नियोजन | विस्तारित मार्गिकेची निविदा प्रक्रिया सुरु
7th Pay Commission | PMPML | पीएमपी कर्मचाऱ्यांना 100% सातवा वेतन आयोग लागू करा | पीएमटी इंटक संघटनेची मुख्यमंत्र्याकडे मागणी

AAP Vijay Kumbhar | पिंपरी चिंचवडमध्ये ‘आप’स्वबळावर लढणार व महापौर बसणार : विजय कुंभार

Aam Aadami Party – (The Karbhari News Service) – आम आदमी पार्टी, पिंपरी चिंचवडच्या वतीने रविवार,  १९ जुलै रोजी घरोंदा हॉटेल, मोरवाडी, पिंपरी येथे नियुक्ती पत्र व पक्ष प्रवेश कार्यक्रम संपन्न झाला.कार्यकर्ते व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. (PCMC News)

विविध क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी यावेळी आम आदमी पार्टीमध्ये प्रवेश केला या मध्ये एडवोकेट के.एम.रॉय, ओबीसी समाजासाठी उत्तम काम करणारे राहुल मदने,
सामाजिक कार्यकर्ते विकी पासोटे, सामाजिक कार्यकर्ते, शुभम गाडेकर इत्यादी कार्यकर्त्यांनी पक्ष प्रवेश केला तसेच शहरातील नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना त्यांच्या जबाबदाऱ्यांची नियुक्ती पत्रे प्रदान करण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आपचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष  विजय कुंभार होते, तर शहराध्यक्ष रविराज बबन काळे यांनी आयोजनाची धुरा सांभाळली.

आगामी पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक आम आदमी पार्टी स्वबळावर लढवणार आहे. पालिका निवडणुकीच्या तयारीला लागा. आपचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष मा. विजय कुंभार यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केलं आहे.

तर आम आदमी पार्टी हा पिंपरी चिंचवडमध्ये भक्कम पर्याय म्हणून उभा राहणार आहे. येत्या महापालिका निवडणुकीत ‘आप’चा झेंडा पिंपरी चिंचवडच्या प्रत्येक भागात नक्कीच फडकणार, असा विश्वास पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष रविराज बबन काळे यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमात पक्षवाढ, संघटन बळकट करण्याचा निर्धार करण्यात आला.’आप’चा झेंडा संपूर्ण शहरात फडकवण्याचा संकल्प सर्व कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
यावेळी पक्षाचे महासचिव सचिन पवार, वरिष्ठ उपाध्यक्ष वैजनाथ शिरसाट, प्रवक्ते सुरेश गायकवाड, उपाध्यक्ष डॉक्टर अनिल रॉय व संपूर्ण पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.