Recruitment | PMC Pune | पुणे महापालिका भरती | महापालिकेकडून नवीन उमेदवारांच्या हंगामी नेमणुका!  | आता लिपिक पदाच्या परीक्षेच्या निकालाची प्रतीक्षा

HomeBreaking Newsपुणे

Recruitment | PMC Pune | पुणे महापालिका भरती | महापालिकेकडून नवीन उमेदवारांच्या हंगामी नेमणुका! | आता लिपिक पदाच्या परीक्षेच्या निकालाची प्रतीक्षा

Ganesh Kumar Mule Nov 11, 2022 1:04 PM

Honeytrap DRDO Scientist | पाकिस्तानला गोपनीय माहिती पुरविल्याने DRDO च्या शास्त्रज्ञाला अटक
MP Supriya Sule | मुंबई-सोलापूर मार्गावर धावणाऱ्या सर्व रेल्वेगाड्यांना भिगवण रेल्वेस्थानकावर थांबा द्या
Eid-ul-Zuha | बुधवारच्या ऐवजी आता गुरुवारी सुट्टी! | राज्य सरकारकडून अधिसूचना जारी

पुणे महापालिका भरती | महापालिकेकडून नवीन उमेदवारांच्या हंगामी नेमणुका!

| आता लिपिक पदाच्या परीक्षेच्या निकालाची प्रतीक्षा

पुणे | पुणे महापालिकेकडून विविध रिक्त पदासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. सर्व पदासाठी परीक्षा घेण्यात आली. यामध्ये कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी), कनिष्ठ अभियंता (वाहतूक नियोजन), सहायक अतिक्रमण निरीक्षक, सहायक विधी अधिकारी तसेच कनिष्ठ लिपिक/ टंकलेखक पदाचा समावेश आहे. लिपिक पद सोडले तर सर्व पदाच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. शिवाय शुक्रवारी महापालिका प्रशासनाने कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) आणि कनिष्ठ अभियंता (वाहतूक नियोजन) आणि सहायक विधी अधिकाऱ्यांच्या हंगामी नेमणुका देखील केल्या आहेत. नुकतेच या बाबतचे आदेश जारी करण्यात आले आहेत. मात्र आता परीक्षा दिलेल्या उमेदवारांना लिपिक पदाच्या परीक्षेच्या निकालाची प्रतीक्षा आहे. प्रशासनाकडून सांगण्यात आले होते कि या आठवड्यात निकाल लागेल. मात्र अजून हा निकला लांबला आहे.

पुणे महापालिकेत विविध खात्यातील 448 पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील गट-२ व गट ३ मधील रिक्त असणारी पदे सरळसेवा प्रवेशाने भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. यासाठी 20 जुलै ते 10 ऑगस्ट या कालावधीत अर्ज मागवण्यात आले होते. त्यानुसार कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) आणि कनिष्ठ अभियंता (वाहतूक नियोजन) या पदासाठी 26 सप्टेंबर ला परीक्षा घेण्यात आली. कनिष्ठ अभियंता (सिव्हिल इंजिनियर) या पदासाठी 3 ऑक्टोबर ला परीक्षा घेण्यात आली. 4 ऑक्टोबर ला सकाळच्या सत्रात सहायक अतिक्रमण निरीक्षक या पदासाठी तर दुपारच्या सत्रात सहायक विधी अधिकारी पदासाठी परीक्षा झाली. तर कनिष्ठ लिपिक/ टंकलेखक पदाच्या परीक्षा या 10, 12 आणि 13 ऑक्टोबर झाल्या. लिपिक पद सोडले तर सर्व पदाच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. शिवाय शुक्रवारी महापालिका प्रशासनाने कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी), कनिष्ठ अभियंता (वाहतूक नियोजन) आणि सहायक विधी अधिकाऱ्यांच्या हंगामी नेमणुका देखील केल्या आहेत. नुकतेच या बाबतचे आदेश जारी करण्यात आले आहेत.

| हे आहेत नेमणूक केलेले अधिकारी

| सहायक विधी अधिकारी

१.प्राजक्ता भुतडा

२. विनया बोरसे

३. निलेश बडगुजर

४. हर्षवर्धन सूर्यवंशी

| कनिष्ट अभियंता (वाहतूक नियोजन)

१. सौरभ चौधरी

२. रश्मी देशमुख

३. प्रज्वल मेंढे

४. वीरपाल गिरसे

| कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी)

१. अर्जुन माने

२. शुभम धायगुडे

३. अक्षय लडकत

४. चेतन शेंडे

५. दिव्या शिंदे