क्रांति दिवस उत्साहात संपन्न
महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालय हिंदी अध्यापक संघाचा उपक्रम
पुणे- एक दिवस क्रांति दिवस साजरा केल्याने आपली जबाबदारी पूर्ण होत नाही, तर आपल्याला आपल्या अभ्यासक्रम मध्ये सुद्धा त्या अनुसरून हिंदी कविताचा समावेश केला पाहिजे, असे मत डॉ. ईश्वर पवार यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालय हिंदी अध्यापक संघाच्या वतीने “क्रांति दिनाचे आयोजन करण्यात आले होते, त्या वेळी ते बोलत होते. ते म्हणाले की स्वतंत्र आणि हिंदी कविता यांचे खूप जवळचे नाते आहे. हिंदी कवितेचा काळ हा खूप सुवर्ण काळ आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी प्रा.रेवनानाथ कर्डिले हे होते.
कर्डिले सरांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात देशाच्या स्वातंत्र्य लढयात हिंदी लेखक,कवी व पत्रकार यांचे महत्वपूर्ण योगदान याविषयी माहिती दिली.डॉ मिलिंद कांबळे म्हणाले कि, स्वतंत्रता प्राप्ति मध्ये साहित्यकारानी अतियश महत्वपूर्ण योगदान दिले आहे. ज्यामुळे त्यांना पण या क्रांतिकाराका प्रमाणे विसरता कामा नये.
डॉ.नेहा बोरसे म्हणाल्या कि, आज ज्या स्वातंत्र्याचा आपण आनंद घेत आहोत त्या साठी अनेक क्रांतिकारियों नी आपल्या जीवाची पर्वा केली नाही त्यामुळे आपण त्याचे स्मरण करुण असे दिवस साजरे केले पाहिजे. प्रा.संजय पवार म्हणाले कि, देशा साठी ज्यांनी बलिदान दिले आहे त्या प्रत्येकाची जाणीव असावी.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक पुणे जिल्हा अध्यक्ष डॉ. बबिता राजपूत यांनी केले. प्रस्ताविक करताना डॉ राजपूत म्हणाल्या कि, देशाचा इतिहास सांगितला गेला तरच नवीन पीढ़ी इतिहास निर्माण करु शकेल.
या कार्यक्रम प्रसंगी महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालय हिंदी अध्यापक संघाचे राज्यकार्याध्यक्ष सुंदर लोंढे, डॉ. राजकुमार कांबळे, डॉ. संजय दंडवते, विनोद सूर्यवंशी, जावेद शेख, मधु भंभानी, क्षमा करजगावकर, चारु दाभोलकर, रविंद काळे, सुनील कांडेकर, सुनीता जमदाड़े व राज्यातून सर्व विभागातून इतर शिक्षक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन डॉ. आदिनाथ भाकड यांनी तर आभार प्रदर्शन अप्पासाहेब यमपुरे नी केले.