केंद्रातील मोदी सरकार सर्वसामान्यांचे नसून केवळ हम दो हमारे दो चे – अरविंद शिंदे
पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने पुणे सातारा रोड, भापकर पेट्रोल पंपाजवळ महागाई, बेरोजगारी व जीवनावश्यक वस्तूंवरील वाढलेल्या GST च्या विरोधात प्र. अध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आक्रोश आंदोलन करण्यात आले.
यावेळी बोलताना अरविंद शिंदे म्हणाले की, ‘‘खोटी आश्वासने देऊन सत्तेत आलेल्या मोदी सरकारने पेट्रोल, डिझेल, एलपीजी गॅस, सीएनजी, पीएनजीचे दर दिवसेंदिवस वाढविले आहेत. महागाईने जनता त्रस्त असताना केंद्र सरकारने दूध, दही, पनीर, आटा, तेल, तूप यासह जीवनावश्यक वस्तूंवरही GST लावला आहे. मोदी सरकारने GST तून शाळकरी मुलांनाही सोडले नाही, शालेय वस्तूंवरही GST लावला आहे. रुग्णालयात उपचार घेण्यावरही GST भरावा लागणार आहे. हे सरकार केवळ हम दो हमारे दो असून मोदी, शहा व आदानी, अंबानी दोन विकाणारे व दोन विकत घेणारे यांचे आहे. मागील ४५ वर्षातील बेरोजगारीने उच्चांक गाठला आहे. २०१४ ते २०२२ पर्यंत विविध विभागांमध्ये नोकऱ्यांसाठी २२ कोटी अर्ज मिळाले मात्र केवळ ७ लाख उमेदवारांना नोकरी देण्यात आल्याचे केंद्र सरकारनेच लोकसभेत सांगितले आहे. एवढी भयानक अवस्था आहे. तर लष्करात भरती होऊन देशाची सेवा करु पाहणाऱ्या तरुणांना फक्त ४ वर्षाची सेवा व नंतर निवृत्ती अशी ‘अग्निपथ’ नावाची योजना आणली आहे. या योजनेला तरुण वर्गांचा तीव्र विरोध असून काँग्रेस पक्ष तरुणांच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे.’’
यानंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष रमेश बागवे, ॲड. अभय छाजेड, संजय बालगुडे, आबा बागुल, वीरेंद्र किराड, कमल व्यवहारे, संगीता तिवारी, अविनाश बागवे आदींची भाषणे झाली.
यावेळी नगरसेवक लता राजगुरू, अजित दरेकर, रविंद्र धंगेकर, रफिक शेख, सुजाता शेट्टी, वैशाली मराठे, अनिल सोंडकर, ब्लॉक अध्यक्ष सतिश पवार, रमेश सोनकांबळे, सचिन आडेकर, प्रदिप परदेशी, शोएब इनामदार, प्रविण करपे, नीता रजपूत, रजनी त्रिभुवन, उस्मान तांबोळी, बाळासाहेब दाभेकर, रमेश अय्यर, सुनिल शिंदे, द. स. पोळेकर, सुजित यादव, नरेंद्र व्यवहारे, उमेश कंधारे, अविनाश गोतारणे, अनिल अहिर, रवि मोहिते, भरत सुराणा, परवेत तांबोळी, अनुसया गायकवाड, नंदा ढावरे, वैशाली रेड्डी, बेबी नाज, योगिता सुराना, रजिया बल्लार, स्वाती शिंदे, ताई कसबे, शानी नौशाद, राधिका मखामले, नलिनी दोरगे, सीमा महाडिक, अनिता धिमधिमे, अश्विनी गवारे, ज्योती परदेशी, नरसिंह आंदोली, दिपक ओव्हाळ, वाल्मिक जगताप, भगवान कडू, विश्वास दिघे, भरत सुराणा, स्वप्निल नाईक, मामा परदेशी, सादिक कुरेशी, अमित बागुल, प्रविण चव्हाण, आबा जगताप, अन्वर शेख, अविनाश अडसूळ, प्रकाश आरणे, बाळासाहेब प्रताप, बंडू नलावडे, सुरेश कांबळे, डॉ. अनुप बेगी, वाल्मिक जगताप, राजू शेख, आयुब पठाण, हेमंत राजभोज, विकी खन्ना, रॉर्बट डेव्हिड, सुनिल पंडित, रवि पाटोळे, अभिजीत महामुनी, सुरेश चौधरी, दत्ता पोळ, परवेज तांबोळी, हरिष यादव, रावसाहेब खवळे, बाळू कांबळे, केतन जाधव आदी उपस्थित होते.