schools Holidays | जिल्ह्यातील ५ तालुके वगळता इतर तालुक्यातील सर्व शाळांना १४ ते १६ जुलैपर्यंत सुट्टी

HomeपुणेBreaking News

schools Holidays | जिल्ह्यातील ५ तालुके वगळता इतर तालुक्यातील सर्व शाळांना १४ ते १६ जुलैपर्यंत सुट्टी

Ganesh Kumar Mule Jul 13, 2022 1:31 PM

Voter List | मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम घोषित
Child Marriage | अक्षय तृतीयेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात एकही बालविवाह होणार नाही याची नागरिकांनी दक्षता घ्यावी | जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख 
PWD app | दिव्यांग मतदारांसाठी पीडब्ल्युडी ॲपची सुविधा

जिल्ह्यातील ५ तालुके वगळता इतर तालुक्यातील सर्व शाळांना १४ ते १६ जुलैपर्यंत सुट्टी

पुणे : प्रादेशिक हवामान केंद्राने जिल्ह्यात १४ व १५ जुलै रोजी अतिवृष्टीचा इशरा दिला असल्याने जिल्ह्यातील इंदापूर, बारामती, दौंड, शिरूर व पुरंदर हे तालुके वगळता इतर सर्व तालुक्यातील १२ वी पर्यंतच्या सर्व शाळांना १४ जुलै ते १६ जुलै पर्यंत सुट्टी जाहीर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी निर्गमीत केले आहेत.

अतिवृष्टीमुळे कोणत्याही प्रकारची अनूचित घटना घडू नये तसेच आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊन त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होवू नये याकरीता १२ वी पर्यंतच्या सर्व शाळांना वरील कालावधीत सुट्टी राहील. तथापि, या कालावधीत सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कार्यालयीन वेळेत शाळेत उपस्थित राहून स्थानिक प्रशासनाच्या आदेशानुसार आपत्ती व्यवस्थापनाचे कामकाज करावे असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

शाळा सुट्टी बाबत_1 (1)