Ration Card Holders | शिधापत्रिकाधारकांना जुलैच्या धान्यासोबत जूनच्या धान्याचे वितरण

HomeपुणेBreaking News

Ration Card Holders | शिधापत्रिकाधारकांना जुलैच्या धान्यासोबत जूनच्या धान्याचे वितरण

Ganesh Kumar Mule Jul 06, 2022 11:04 AM

Distribution of petrol | दुचाकीस्वारांना रुपये कमी दराने पेट्रोल वाटप | ऍड स्वप्निल जोशी यांच्याकडून कार्यक्रमाचे आयोजन
Chit Fund Amendment Bill | चिटफंड सुधारणा विधेयक विधानसभेत मंजूर  | राज्य शासनाचे अपिलाचे अधिकार प्रशासकीय अधिकाऱ्यास
PMC Helpline | आता पाण्याबाबतच्या तक्रारी करा 24 तास | महापालिकेकडून 1 मार्च पासून हेल्पलाईनची सुविधा

शिधापत्रिकाधारकांना जुलैच्या धान्यासोबत जूनच्या धान्याचे वितरण

पुणे : सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम २०१३ अंतर्गत पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीमधील जून २०२२ चे धान्य न मिळालेल्या पात्र लाभार्थ्यांना जूनचे धान्य जुलै २०२२ च्या धान्यासह उपलब्ध करुन देण्यात आलेले आहे. महानगरपालिका हद्दीतील अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंबातील लाभार्थी व प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेमधील शिधापत्रिकाधारकांनी महानगरपालिकामधील ११ परिमंडळ कार्यालयांच्या अधिनस्त रास्त भाव दुकानदारांकडून ३० जुलैपर्यंत अन्नधान्याचा लाभ घ्यावा, असे अन्नधान्य वितरण अधिकारी कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.