Yerwada Blue Cross Society slab collapse : Report : येरवड्यातील दुर्घटना निषकळजीपणामुळेच!    : समितीने दिला अहवाल 

HomeBreaking Newsपुणे

Yerwada Blue Cross Society slab collapse : Report : येरवड्यातील दुर्घटना निषकळजीपणामुळेच!  : समितीने दिला अहवाल 

Ganesh Kumar Mule Feb 22, 2022 11:15 AM

PMC Solid Waste Management Bylaws | हवा आणि ध्वनी प्रदूषणास कारणीभूत ठरणाऱ्या बावधन मधील मार्बल मार्केट कंपनी वर महापालिकेची कारवाई 
PMC Water Meter | अवास्तव पाणीवापर लपवण्यासाठी आयुक्त बंगला, महापौर बंगल्यावरच  पाणी मीटर्स बसवले नाहीत
Again four member wards | पुन्हा चार सदस्यीय प्रभाग | 2017 नुसार वाॅर्ड संख्या

येरवड्यातील दुर्घटना निषकळजीपणामुळेच!

: समितीने दिला अहवाल

पुणे : पुणे महानगरपालिकेने (Pune Municipal Corporation) येरवड्यातील शास्त्रीनगर ( Shastrinagar, Yerwada)  येथील स्लॅब संरचना कोसळून रात्री उशिरा पाच मजुरांचा मृत्यू आणि चार जण जखमी झाल्याची चौकशी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिपत्याखाली दहा सदस्यीय समिती नियुक्त केली होती. त्या समितीने आपला अहवाल (Primary Report) सादर केला आहे. त्यानुसार ही दुर्घटना निष्काळजीपणा मुळे घडली असल्याचे स्पष्ट झाले आहे.
  युनिफाइड डेव्हलपमेंट कंट्रोल अँड प्रमोशन रेग्युलेशन (UDCPR) 2020 नुसार, चौकशी समिती स्थापन करण्याची तरतूद आहे. त्यानुसार महापालिकेने जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली दहा सदस्यीय वस्तुस्थिती शोध समिती स्थापन केली होती.
 समितीने आपला प्राथमिक अहवाल तीन दिवसांत राज्य सरकारला आणि अंतिम अहवाल 10 दिवसांत सादर करायचा होता.
 पॅनेलमध्ये पोलिस, नगररचना विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, क्रेडाई आणि कामगार कल्याण कार्यालयाचे प्रतिनिधी, मुख्य अग्निशमन अधिकारी, संरचना अभियंता, एक वास्तुविशारद आणि पीएमसीचे अधीक्षक अभियंता यांचाही समावेश होता.  महापालिकेने कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग पुणे (सीओईपी) ला तांत्रिक बाबींचा अभ्यास करण्यास सांगितले होता.

: असा आहे समितीचा अहवाल

विश्लेषण व प्राथमिक निष्कर्ष
येरवडा टि.पी. स्कीम फा. प्लॉट नं. ३ पैकी या मिळकती मधील प्लॉट क्र ३ येथील टॉवर ‘बी’ चे पायाच्या बांधकामासाठी बांधलेल्या लोखंडी सळया कोसळून झालेल्या अपघाताच्या अनुषंगाने तांत्रिक तथ्य शोध समितीच्या वेळोवेळी बैठका झाल्या.  या बैठका मध्ये एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली २०२० मधील परिशिष्ठ ‘क’ विनियम क्र. (सी- ८.५ ) या तरतुदी नुसार प्राथमिक अहवाल सादर करण्याचे ठरले. त्यानुसार सर्व समिती सदस्यानी दिलेले प्राथमिक अहवाल विचारात घेवून या अपघाताबाबतचा समितीचा प्राथमिक निष्कर्ष खालील प्रमाणे नमुद करण्यात येत आहे. तसेच समिती मध्ये झालेल्या चर्चे नुसार आवश्यक्ते नुसार तज्ञाची नेमणूक करून व आवश्यक्ते नुसार सुनावणी घेवून अंतिम अहवाल सादर करण्यात येणार आहे.
प्राथमिक निष्कर्ष :-
प्रकल्पाचे राफ्ट फॉऊडेशन बाबतची बांधकाम कार्यपध्दती, जसे की लोखडी जाळीचे ठेवणी व बांधणी योग्यरित्या करण्यात आलेली नाही. तसेच या जाळ्या मधील उभारावयाच्या घोड्या (Chairs) पुरेशा प्रमाणात व आवश्यक आकारमानाच्या स्टीलच्या उभारण्यात आलेल्या नाहीत. सर्वसाधारण पणे या जाळ्याची बांधणी ही या इमारतीच्या स्ट्रक्चरल ड्रॉईगचा योग्य अभ्यास न करता उभारण्यात आल्याचे दिसुन येते. या राफ्ट फाँऊडेशनच्या उभारणी बाबत योग्य तांत्रिक तपासणी झाली नसल्याचे देखील आढळून आले आहे. या व्यतिरिक्त या अपघात ग्रस्त जागेकडे जाण्याच्या रस्त्याला देखील आवश्यक ते संरक्षक कठडे आढळून आले नाही. तसेच राफ्ट मधील सळया (Dowel bar ) देखील खुल्या सोडल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच वरची जाळी व खालची जाळी मध्ये मनुष्य बळाने काम करावयाचे असतांना त्या दोन्ही जाळ्या स्थिर रहाणेसाठी नियोजन , संकल्पन व कार्यान्वता (Design Excution and Monitoring) चा अभाव दिसुन येतो.
सारांशाने हा अपघात लोखंडी सळईची जाळयांची उभारणी, प्रकल्पाचे डिझाईन नुसार योग्य लोखंडी आधार (Chair) न करता कमी व्यासाची सळई वापरून योग्य रित्या आधार न दिल्याने व ड्रॉईगचा योग्य अभ्यास न करता लोखंडी जाळ्यांची उभारणी कामात योग्य नियंत्रण, समन्वय व आवश्यक तपासणी न करता निष्काळजी पणे केल्याचे प्राथमिक दृष्या आढळून आले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 2