S Chockalingam : प्रभाग रचनेवरील सुनावणीसाठी यशदाचे महासंचालक एस चोक्कलिंगम यांची नियुक्ती 

HomeपुणेBreaking News

S Chockalingam : प्रभाग रचनेवरील सुनावणीसाठी यशदाचे महासंचालक एस चोक्कलिंगम यांची नियुक्ती 

Ganesh Kumar Mule Feb 03, 2022 3:10 PM

Ward Structure : PMC Election : पुणे महापालिका निवडणुकीची प्रभाग रचना जाहीर!  : बाणेर-सुस प्रभागावरून जोरदार चर्चा 
Shivsena Pune | उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात पुणे महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकवणार – शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे
Final Voter List | अंतिम मतदार यादी प्रसिद्धीसाठी 23 जुलै पर्यंत अवधी द्या  | महापालिकेची राज्य निवडणूक आयोगाकडे मागणी 

प्रभाग रचनेवरील सुनावणीसाठी यशदाचे महासंचालक एस चोक्कलिंगम यांची नियुक्ती

: राज्य निवडणूक आयोगाने जारी केले आदेश

 

पुणे : पुणे महापालिका निवडणुकीसाठी(PMC Election) प्रभाग रचना जाहीर झाली आहे. त्यावर हरकती(objections) सूचना देखील येऊ लागल्या आहेत. दरम्यान या हरकती 14 फेब्रुवारी पर्यंत नोंदवायच्या आहेत. यावरील सुनावणीसाठी यशदाचे महासंचालक एस चोक्कलिंगम (S Chockalingam) यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाने (State election commission) नुकतेच हे आदेश जारी केले आहेत.

 

14 फेब्रुवारी पर्यंत हरकती नोंदविता येणार असून या आदेशानुसार, 26 फेब्रुवारी रोजी ही सुनावणी होणार आहे. तसेच या सुनावनीवेळी महापालिका आयुक्‍त, जिल्हाधिकारी, विभागीय अधिकारी यांच्या समक्ष अथवा आयुक्त नसल्यास उपायुक्त दर्जाच्या समकक्ष अधिकाऱ्याच्या उपस्थित घ्यायची असून निवडणूक आयोगास त्याचा अहवाल 2 मार्च पर्यंत सादर करायचा आहे.

 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0