Health Check up : PMC Employee : महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी 

HomeपुणेPMC

Health Check up : PMC Employee : महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी 

Ganesh Kumar Mule Jan 20, 2022 4:56 PM

Medical College of PMC : अखेर महापालिकेच्या मेडिकल कॉलेजला अंतिम मंजुरी!
PMPML | 7th pay Commission | पीएमपी कर्मचारी वेतन आयोग | दोन्ही महापालिका आणि पीएमपी प्रशासनाचे एकमेकांकडे बोट 
Standing Committee Powers : स्थायी समिती अधिकार : महापालिका प्रशासन राज्य सरकार कडून घेणार मार्गदर्शन  : प्रभारी नगरसचिवांनी प्रधान सचिवांना लिहिले पत्र 

महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी

: आरोग्य विभागाचा पुढाकार

पुणे : महापालिका आरोग्य विभागाच्या पुढाकाराने महापालिकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. त्यासाठी 21 जानेवारी पर्यंत माहिती देण्यास सांगितले आहे. याबाबतचे परिपत्रक आरोग्य प्रमुख डॉ आशिष भारती यांनी जारी केले आहे.

: 21 जानेवारी पर्यंत माहिती द्यावी लागणार

डॉ भारती यांनी जारी केलेल्या परिपत्रकानुसार ई  हेल्थ सिस्टीम टेक्नॉलॉजिस्ट एल.एल.पी. यांनी अतिरिक्त महापालिका आयुक्त(ज) यांचेकडे दिनांक ४ जानेवारी २०२२ रोजी , पुणे महानगरपालिकेतील अधिकारी/कर्मचारी यांची मोफत आरोग्य तपासणी संस्थेमार्फत करून देण्यात येईल असे नमूद केले आहे. त्यास अनुसरून मा अतिरिक्त महापालिका आयुक्त (ज) यांनी ई हेल्थ सिस्टीम टेक्नॉलॉजिस्ट एल. एल.पी. यांच्या प्रस्तावानुसार पुणे महानगरपालिकेतील अधिकारी/कर्मचारी यांची मोफत तपासणी करून घेणेस सहमती दर्शविली आहे. सदर तपासण्यांमध्ये के.एफ.टी, एल.एफ.टी, लिपिड प्रोफाईल,इलेक्ट्रोलाईट्स,हिमॅटोलॉजी,शुगर ई.सी.जी. यांचा समावेश असून आपल्या कार्यालयामध्येच सदर संस्थांचे टेक्नीनिअन्स येऊन तपासणी करणार आहेत. सदर तपासण्या करण्यासाठी आपल्या कार्यालयात महिला व पुरूषांसाठी १० बाय १०ची स्वतंत्र रूम, दोन टेबल्स व दोन खुर्त्यांची सोय करण्यात यावी.

ज्या अधिकारी/कर्मचारी यांना ऐच्छिक मोफत तपासणी करून घ्यावयाची आहे त्यांनी आपली नांवे खातेप्रमुखांमार्फत एकत्रित यादी आरोग्य विभागाकडे खालील तक्यानुसार दिनांक २१ जानेवारी २०२२ पर्यंत सादर करावी. तसेच त्याची सॉप्ट कॉपी health@punecorporation.org या ई-मेलवर पाठविण्यात यावी. असे परिपत्रकात म्हटले आहे.