PMC: Labour payments: ठेकेदाराकडील कामगारांना वेळेत वेतन देण्याचे आदेश   : महापालिका आयुक्तांनी खाते प्रमुखांना सुनावले

HomeपुणेBreaking News

PMC: Labour payments: ठेकेदाराकडील कामगारांना वेळेत वेतन देण्याचे आदेश : महापालिका आयुक्तांनी खाते प्रमुखांना सुनावले

Ganesh Kumar Mule Jan 20, 2022 3:59 AM

Balgandharva Rangmandir : बालगंधर्व रंगमंदिर पाडण्यास शिवसेनेचा विरोध : महापालिका आयुक्तांना दिले निवेदन 
Securtiy Guard | PMC | पुणे महानगरपालिकेतील सुरक्षारक्षकांची सुरक्षा वाऱ्यावर | सुनील शिंदे
PMC : Purchase of 80 lit buckets : नगरसेवकांच्या मागणीनुसार विविध प्रभागांसाठी 80 लिटरच्या बकेटची खरेदी  : 80 लाखाचा येणार खर्च ; स्थायी समितीची मान्यता 

ठेकेदाराकडील कामगारांना वेळेत वेतन देण्याचे आदेश

: महापालिका आयुक्तांनी खाते प्रमुखांना सुनावले

पुणे : महापालिकेत ठेकेदाराकडे काम करणाऱ्या कामगारांना वेळेवर वेतन दिले जात नाही. याबाबत कामगारांच्या तसेच नगरसेवकांच्या देखील तक्रारी आहेत. मुख्य सभेत देखील यावर चर्चा होते. असे असताना देखील टेंडरची मुदत संपल्यानंतर देखील नवीन टेंडर काढले जात नाही. त्यामुळे कामगारांना वेळेवर वेतन मिळत नाही. याबाबत महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी खाते प्रमुखांना सुनावले आहे. शिवाय यापुढे टेंडर प्रक्रिया संपण्यापूर्वी नविन टेंडरची प्रक्रिया वेळेत पूर्ण करून ठेकेदाराकडील कामगारांचे महिनेमाहचे वेतन वेळेत देण्याची दक्षता घेण्यात यावी. असे आदेश आयुक्तांनी प्रशासनाला दिले आहेत.

: आदेशात आयुक्त काय म्हणतात?

माझे असे निदर्शनास आले आहे की, बहुतांश खात्यांमध्ये/विभागामध्ये टेंडर प्रक्रिया राबविताना सदर टेंडरची मुदत संपल्यानंतरही नवीन टेंडर प्रक्रिया करण्यात आली नाही किंवा करण्यात येत नाही. या कारणास्तव बहुतांशी खात्याकडील ठेकेदाराकडील कामगारांचे महिनेमाहचे वेतन विहीत वेळेत आदा केले जात नाही. वरील बाब विचारात घेता, असे सूचित करण्यात येते की, यापुढे टेंडर प्रक्रिया संपण्यापूर्वी नविन टेंडरची प्रक्रिया वेळेत पूर्ण करून ठेकेदाराकडील कामगारांचे महिनेमाहचे वेतन वेळेत देण्याची दक्षता घेण्यात यावी. याबाबतची सर्वस्वी जबाबदारी संबंधित खातेप्रमुख यांचेवर राहील, याची नोंद घेण्यात यावी.