पुणे शहरातील पाचशे फुटांपर्यंतच्या घरांना मिळकत कर माफ करावा : नितीन कदम
-राष्ट्रवादी अर्बन सेलच्या वतीने दिला स्थायी समितीला ठराव
पुणे : मुंबई मनपाने पाचशे फुटांपर्यंतच्या घरांना मिळकत कर माफ करून सवलत दिली आहे. त्याच धर्तीवर पुणे मनपाने सुद्धा शहरातील पाचशे स्क्वेअर फिट पर्यंतच्या घरांना मिळकत कर माफ करून सवलत द्यावी. असा प्रस्ताव राष्ट्रवादी कॉंग्रेस कडून स्थायी समितीमध्ये दिला आहे.
राष्ट्रवादी अर्बन सेलच्या अश्विनी कदम (नगरसेविका) व लक्ष्मी ताई दुधाने (नगरसेविका) यांच्या वतीने सदरचा प्रस्ताव देण्यात आला आहे. अशी माहिती अर्बन राष्ट्रवादी अर्बन सेल पुणे अध्यक्ष नितीन कदम यांनी दिली.
मागील पाच वर्षांमध्ये पुणे मनपाने मिळकत करांमध्ये व पाणीपट्टी मध्ये दुपटीपेक्षा जास्तीने वाढ केलेली आहे तसेच 40% सवलत ही रद्द केली आहे. एकीकडे अपुऱ्या नागरी सुविधा, वाढता भ्रष्टाचार व या मिळकत करीत करांच्या वसुलीसाठी अवलंबलेली सावकारी पद्धत यातून सर्वसामान्य पुणेकर धास्तावलेला आहे. अशा परिस्थितीत सदरचा प्रस्ताव मान्य करून पुणे मनपाने नागरिकांना दिलासा द्यावा हीच मागणी आहे.
COMMENTS