शहरातील Active केसेस ११ हजाराच्या पार
: आज नवे २४७१ रुग्ण मिळाले
पुणे : कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे पुणेकरांच्या चिंतेत भर पडत आहे. आज (शनिवार, ८ जानेवारी) पुणे मनपाच्या हद्दीत तब्बल २ हजार ४७१ रुग्ण आढळले आहेत. दरम्यान यामुळे आता active केसेस चा आकडा वाढला असून तो आता ११ हजार ५५० झाला आहे.
शनिवारी पुण्यात ७११ जणांनी कोरोनावर मात केली आहे. शहरात दोन कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे शहरातील आतापर्यंतच्या मृत्यूंची संख्या ९ हजार १२६ वर गेली आहे. वाढत्या कोरोना संसर्गामुळे जिल्ह्यातील पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळा पुन्हा बंद करण्यात आल्या आहेत. तसेच राज्यातील कॉलेजेसही १५ फेब्रुवारीपर्यंत बंद असणार आहेत.
– दिवसभरात 2471 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात 711 रुग्णांना डिस्चार्ज.
– 02 करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू.
– एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या –
522006
– ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 11550
– एकूण मृत्यू – 9126
– एकूण डिस्चार्ज- 501330
– दिवसभरात झालेल्या टेस्ट्- 19186
COMMENTS