MLA MP Fund Pune | पुण्यात आमदार-खासदार फंडाचा हिशेब गायब! सजग नागरिक मंचचा जिल्हाधिकाऱ्यांना इशारा

AI Image

Homeadministrative

MLA MP Fund Pune | पुण्यात आमदार-खासदार फंडाचा हिशेब गायब! सजग नागरिक मंचचा जिल्हाधिकाऱ्यांना इशारा

Ganesh Kumar Mule Sep 29, 2026 12:36 PM

Manoj Jarange Patil | मनोज जरांगे पाटील यांची एसआयटी चौकशी रद्द करा | मराठा क्रांती मोर्चाची मागणी 
Daund MlA Rahul Kul News | पुणे महापालिकेकडून मुठा उजव्या कालव्यात सोडण्यात येत असलेले सांडपाणी बंद करण्याची मागणी 
New Collector of Pune IAS Suhas Diwase  | Transfer of IAS Dr. Rajesh Deshmukh

MLA MP Fund Pune | पुण्यात आमदार-खासदार फंडाचा हिशेब गायब! सजग नागरिक मंचचा जिल्हाधिकाऱ्यांना इशारा

| १० वर्षांची माहिती वेबसाईटवर टाकण्याची मागणी

 

Vivek Velankar – (The Karbhari News Seervice)  – राज्यातील आमदार आणि खासदारांना दरवर्षी स्थानिक विकासासाठी ५ कोटी रुपयांचा निधी मिळतो. या निधीतून होणाऱ्या कामांची अंमलबजावणी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत होते. हा निधी जनतेच्या करातून येत असल्याने त्याचा हिशेब जनतेसमोर असणे बंधनकारक आहे. मात्र, याबाबत मुख्य माहिती आयुक्तांनी २०१७ साली दिलेले आदेश पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पाळले जात नसल्याचा गंभीर आरोप सजग नागरिक मंचचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी केला आहे. (Sajag Nagrik Manch Pune)

या संदर्भात वेलणकर यांनी जिल्हाधिकारी, पुणे यांना निवेदन दिले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, तत्कालीन मुख्य माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांनी ३० जानेवारी २०१७ रोजी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले होते.

आदेशात काय होते?
जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या संकेतस्थळावर आमदार-खासदार निधीची संपूर्ण माहिती दोन प्रपत्रात दर महिन्याला अद्ययावत करावी.
१) पहिल्या प्रपत्रात – प्रत्येक कामाची जागा, आमदार/खासदाराचे पत्र, प्रशासकीय मंजुरी, कार्यान्वयीन यंत्रणा, मंजूर रक्कम, वितरित रक्कम.
२) दुसऱ्या प्रपत्रात – टेंडरची माहिती, कंत्राटदाराचे नाव, कामाची रक्कम, कामाची प्रगती आणि निरीक्षण अहवाल.

या आदेशाचे पालन अद्याप झालेले नाही. त्यामुळे गेल्या दहा वर्षांची सर्व माहिती तातडीने संकेतस्थळावर प्रसिद्ध करावी, अन्यथा माहिती अधिकार कायद्याच्या कलम १८ अन्वये मुख्य माहिती आयुक्तांकडे तक्रार दाखल करू, असा इशारा सजग नागरिक मंचने दिला आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0