Pune PMC Divyang Yojana | पुणे महापालिकेच्या दिव्यांग योजनांचा आदर्श! | अभ्यास करण्यासाठी नाशिक महापालिकेचे पत्र

पुणे महापालिकेच्या 13 दिव्यांग योजनांचा आदर्श, नाशिक महापालिकेने मागवली माहिती

Homeadministrative

Pune PMC Divyang Yojana | पुणे महापालिकेच्या दिव्यांग योजनांचा आदर्श! | अभ्यास करण्यासाठी नाशिक महापालिकेचे पत्र

Ganesh Kumar Mule Sep 23, 2026 9:28 AM

PMC Budget 2024-25 | पुणे महापालिका आयुक्त 7 मार्च ला सादर करणार अंदाजपत्रक!  
PMC Budget 2026-27 | स्थायी समिती कडून अध्यक्षांना अंदाजपत्रक सादर करण्याचे अधिकार सुपूर्त! | २४ मार्च ला अध्यक्ष अंदाजपत्रक सादर करण्याची शक्यता!
Pune Property tax | ५०० चौरस फुटांपर्यंतच्या महिलांच्या नावावरील मिळकतींना ५० टक्के मिळकत करमाफी | महिलांच्या सक्षमीकरणावर महापालिकेचा भर

Pune PMC Divyang Yojana | पुणे महापालिकेच्या दिव्यांग योजनांचा आदर्श! | अभ्यास करण्यासाठी नाशिक महापालिकेचे पत्र

 

PMC SDD – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिकेच्या समाज विकास विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या दिव्यांग कल्याणकारी योजनांची राज्यभर चर्चा सुरू असून आता नाशिक महानगरपालिकेने थेट पुणे महापालिकेकडून या योजनांची सविस्तर माहिती मागवली आहे. याबाबतचे अधिकृत पत्र नाशिक महापालिकेचे उपायुक्त (समाज कल्याण) नितीन नेर यांनी पुणे महापालिका आयुक्तांना पाठवले आहे. (Nashik Municipal Corporation – NMC)

प्रहार अपंग क्रांती संघटना, नाशिकचे जिल्हाध्यक्ष ललित सुरेश पवार यांनी नगर विकास विभागाच्या शासन निर्णयानुसार दिव्यांग निधी खर्च करताना काही निधी दरवर्षी अखर्चित राहत असल्याने दिव्यांगांच्या अनुदानात वाढ करून ३००० रुपयांवरून ६००० रुपये करावी, अशी मागणी नाशिक महापालिकेकडे केली होती. या मागणीच्या अनुषंगाने नाशिक महापालिकेने पुण्यात कोणत्या योजना राबवल्या जातात, किती लाभ दिला जातो आणि कोणती कागदपत्रे घेतली जातात, याची माहिती मागवली आहे.

पुणे महापालिकेच्या समाज विकास विभागामार्फत एकूण ६१ योजना राबवल्या जातात. त्यापैकी १३ योजना या केवळ दिव्यांग बांधवांसाठी आहेत, तर उर्वरित योजना महिला आणि युवकांसाठी आहेत. समाज विकास विभाग या योजनांवर दरवर्षी सरासरी ४० ते ४५ कोटी रुपये खर्च करतो. चालू आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये या विभागाला ५९ कोटी रुपयांची विक्रमी तरतूद करण्यात आली आहे.

दिव्यांगांसाठी कोणत्या आहेत योजना?

पुणे महापालिकेकडून दिव्यांगांना केवळ आर्थिक मदतच नव्हे, तर स्वावलंबी बनवण्यासाठी विविध योजना दिल्या जातात. त्यामध्ये –

१. दिव्यांगांना मोफत पीएमपीएमएल बस पास
२. कृत्रिम अवयव व साधने खरेदीसाठी अर्थसहाय्य
३. स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य
४. उच्च शिक्षण व प्रशिक्षणासाठी अर्थसहाय्य
५. १८ वर्षांपुढील मतिमंद व्यक्तींचा सांभाळ करणाऱ्या नोंदणीकृत स्वयंसेवी संस्थेस किंवा पालकांस अर्थसहाय्य
६. दिव्यांग-दिव्यांग व दिव्यांग-अव्यंग विवाहासाठी अर्थसहाय्य
७. दिव्यांगांनी स्थापित केलेल्या कला पथकास वाद्य खरेदीसाठी अर्थसहाय्य
८. दिव्यांग व्यवसाय गटांनी सुरू केलेल्या व्यवसाय वृद्धीसाठी अर्थसहाय्य
९. दृष्टीहीन व्यक्तींसोबतच्या मदतनीसाला पीएमपीएमएल तिकिटात ५०% सवलत
१०. दिव्यांग व्यक्तींना वार्षिक सर्वसाधारण अर्थसहाय्य

यासोबतच दिव्यांगांसाठी काही प्रस्तावित प्रकल्प योजनांवरही महापालिका काम करत आहे.

नाशिक महापालिकेचे हे पत्र नुकतेच पुणे महापालिकेत दाखल झाले असून यावर पुणे महापालिका काय माहिती देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पुणे पॅटर्ननुसार नाशिकमध्येही दिव्यांगांच्या अनुदानात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: