Pune Water Cut | पुणेकरांनो सावधान! गुरुवारी शहराच्या मोठ्या भागात पूर्ण दिवस पाणीपुरवठा बंद | शुक्रवारीही कमी दाबाने पाणी

HomeBreaking News

Pune Water Cut | पुणेकरांनो सावधान! गुरुवारी शहराच्या मोठ्या भागात पूर्ण दिवस पाणीपुरवठा बंद | शुक्रवारीही कमी दाबाने पाणी

Ganesh Kumar Mule Sep 07, 2026 8:22 PM

PMC CPS Scheme | अंशदायी पेन्शन योजने अंतर्गत बिलाच्या स्लिप न मिळाल्याने महापालिका कर्मचारी संदिग्ध अवस्थेत!
Old Pension Schemes | चांगली बातमी!  जुनी पेन्शन योजना लागू होणार?  | केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार OPS चा लाभ?  
Otur News | श्रावणधारा महोत्सवात चार काव्यसंग्रहांचे प्रकाशन | तिसरा राज्यस्तरीय श्रावणधारा काव्यमहोत्सव ओतूर येथे उत्साहात संपन्न

Pune Water Cut | पुणेकरांनो सावधान! गुरुवारी शहराच्या मोठ्या भागात पूर्ण दिवस पाणीपुरवठा बंद | शुक्रवारीही कमी दाबाने पाणी

 

Pune Water cut News – (The karbhari News Service) – जुने पर्वती जलशुद्धीकरण केंद्र अंतर्गत येणाऱ्या स्टेज २ अंतर्गत विद्युत/पंपिंग विषयक व स्थापत्य विषयक तातडीच्या देखभाल दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली असून, त्यामुळे शहराच्या मोठ्या भागातील पाणीपुरवठा बुधवार रात्री १२:०० पासून गुरुवार रात्री १२:०० वाजेपर्यंत (गुरुवार दि. १०) पूर्ण दिवस बंद राहणार आहे. तसेच शुक्रवार  ११ रोजी सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता असून, नागरिकांनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता नंदकिशोर जगताप यांनी केले आहे.

पर्वती HLR झोन, भामा आसखेड जॅकवेल, वारजे जलकेंद्र व त्या अखत्यारीतील एस.एन.डी.डी. (एच.एल.आर.), चांदणी चौक टाकी परिसर, गांधी भवन टाकी परिसर, पॅनकार्ड क्लब GSR टाकी परिसर, वारजे जलकेंद्र लगत GSR टाकी परिसर, पाषाण व सुस गोल टाकी परिसर, चतुःश्रृंगी टाकी परिसर, जुने वारजे जलकेंद्र भाग, नवीन व जुने होळकर जलकेंद्र, कोंढवे-धावडे जलकेंद्र तसेच वडगाव जलकेंद्र येथील पंपिंगच्या अखत्यारीतील परिसरांना या बंदचा फटका बसणार आहे.

कोणकोणत्या भागात पाणीपुरवठा बंद राहणार, पाहा सविस्तर यादी :

पर्वती HLR टाकी परिसर : सहकारनगर, पद्मावती, बिबवेवाडी, मुकुंदनगर काही भाग, महर्षीनगर, गंगाधाम, चिंतामणीनगर भाग-१ व २, लेक टाऊन, शिवतेजनगर, अप्पर इंदिरानगर, लोअर इंदिरानगर, शेळकेवस्ती महेश सोसायटी, बिबवेवाडी गावठाण, प्रेमनगर, आंबेडकरनगर डायस प्लॉट, ढोले मळा, सॅलेसबरी पार्क, गरीधरभवन चौक, ठाकरे वसाहत, पर्वती गावठाण, भाग्योदयनगर, शिवनेरीनगर, मिठानगर, कुमार पृथ्वी, स.नं.४२ कोंढवा खुर्द, साईबाबानगर, जनता वसाहत इत्यादी.

भामा आसखेड : लोहगाव, कळस धानोरी, टिंगरे नगर, विमाननगर, वडगावशेरी, कल्याणीनगर, विश्रांतवाडी, फुलेनगर, येरवडा, खराडी, आळंदी नगर परिषद व संलग्न परिसर इत्यादी.

एस.एन.डी.डी. (एच.एल.आर.) : गोखलेनगर, औंध, बोपोडी, पुणे विद्यापीठ, लॉ कॉलेज रोड, महाबळेश्वर हॉटेलपर्यंत बाणेर रोड, बीएमसीसी कॉलेज रोड, आयसीएस कॉल्स भोसलेनगर, सेनापती बापट रोड, भांडारकर रोड, प्रभात रोड, पौड रोड शीला विहार कॉलनी, अद्वैत सोसायटी, भीमनगर, वेदांतनगरी, कुलश्री कॉलनी परिसर, सहवास, क्षिप्रा, मनमोहन सोसायटी, विठ्ठल मंदिर परिसर, गोसावी वस्ती परिसर, करिष्मा सोसायटी समोरील परिसर, बिग बाझार परिसर, बंधन सोसायटी परिसर, डी.पी. रस्ता (पार्ट), मयूर कॉलनी परिसर, कर्वेरोड झाला सोसायटी ते शिवाजी पुतळ्यापर्यंतचा भाग, दशभुजा गणपती ते नळस्टॉप, सहकार वसाहत म्हात्रे पुलापर्यंत, एच.ए.कॉलनी टिळेकर प्लॉट, भरतनगर अर्चनानगर, भरतकुंज, स्वप्नमंदिर, सुनिता, युको बँक कॉलनी, टँकरपॉईंट डी.पी.रस्ता, मंगेशकर हॉस्पिटल, हिमाली सोसायटी, वकिलनगर, करिष्मा सोसायटी ते वारजे वार्ड ऑफिस, गिरीजा शंकर, नवसह्याद्री, ताथवडे उद्यान परिसर, निलकमल, युनायटेड वेस्टर्न, अनुरेखा, स्थैर्य, मधुचय, शैलेश, अलंकार, मनिषा, स्वस्तिश्री, रघुकुल महिम्न, सुखा जयशक्ती इत्यादी.

चांदणी चौक टाकी परिसर : पाषाण साठवण टाकी, भूगाव रोड परिसर, कोकाटे वस्ती, सेंटीन हिल सोसायटी, मधुवन सोसायटी, संपूर्ण बावधन परिसर, उजवी व डावी भुसारी कॉलनी व चढावरील भाग, चिंतामणी सोसायटी, गुरुगणेश नगर, सूरज नगर, सागर कॉलनी, भारतीनगर, सारथीशिल्प सोसायटी, पूजा पार्क, शांतीबन सोसायटी परिसर, डुक्कर खिंडीकडील भाग, शास्त्रीनगर, न्यू लक्ष्मीनगर, परमहंस नगर, पूर्ण पाषाण, सोमेश्वरवाडी, सुतारवाडी, निम्हणमळा, लम्हाणतांडा, मोहन नगर, सुस रोड इत्यादी.

गांधी भवन टाकी परिसर : कुंभारवाडी टाकी परिसर, काकडे सिटी, होम कॉलनी, सिप्ला फाउंडेशन, रेणुका नगर, हिल व्ह्यू गार्डन सिटी, पाप्युलर कॉलनी, वारजे माळवाडी परिसर, गोकुळनगर, अतुलनगर, बी.एस.यु.पी स्कीम, महात्मा सोसायटी परिसर, भुजबळ टाऊनशिप, एकलव्य कॉलेज परिसर, कुमार परिसर, धनंजय सोसायटी, रोहन गार्डन परिसर, कोथरूड वॉर्ड ऑफिस परिसर, अथर्व वेद, स्नेहल अमित पार्क, कांचन गंगा, अलकनंदा, शिवप्रभा मंत्री पार्क-१, आरोह सोसायटी, श्रावण धारा झोपडपट्टी, सहजानंद (पार्ट), शांतीवन गांधी स्मारक, किर्लोस्कर डीझेल कंपनी, लक्ष्मीनगर झोपडपट्टी, मृण्मयी प्रिमारोज आर्चिड लेन ७ व ९, मुंबई-पुणे बायपास रोड दोन्ही बाजू, शेरावती सोसायटी, सिद्धकला सोसायटी, श्रीराम सोसायटी, गिरीष सोसायटी, तिरुपती नगर, कुलकर्णी हॉस्पिटल परिसर, हिंगणे होम कॉलनी, मिलेनियम स्कूल, कर्वेनगर गावठाण, तपोधाम परिसर, राम नगर, गोसावी वस्ती, कॅनॉल रोड.

पॅनकार्ड क्लब GSR टाकी परिसर : बाणेर, बालेवाडी, बाणेर गावठाण, चाकणकर मळा, पॅनकार्ड क्लबरोड, पल्लोड फार्म, शिंदे पारखे वस्ती, विधाते वस्ती, मेडिपॉईंट रोड, विजयनगर, आंबेडकरनगर, दत्तनगर इत्यादी.

वारजे जलकेंद्र लगत GSR टाकी परिसर : कर्वेनगर गावठाण परिसर, तपोधाम सोसायटी, शाहू कॉलनी गल्ली क्र. १ ते ११, इंगळेनगर, वारजे जकात नाका परिसर, कर्वेनगर कॅनॉल गल्ली क्र. १ ते १०.

पाषाण व सुस गोल टाकी परिसर : गणराज चौक, पॅनकार्ड रोड, वीरभद्र नगरचा काही भाग, समर्थ कॉलनी काही भाग इत्यादी.

चतुःश्रृंगी टाकी परिसर : औंध, बोपोडी, भोईटेवस्ती, पुणे विद्यापीठ परिसर, चिखलवाडी, खडकी, आनंदपार्क, सानेवाडी, आंबेडकर वसाहत, संकल्प पार्क, सकाळनगर, चव्हाणनगर, अभिमानश्री सोसायटी, नॅशनल, सिंघ सोसायटी, औंधगाव परिसर.

जुने वारजे जलकेंद्र भाग : रामनगर, अहिरेगाव, माळवाडी, सहयोगनगर पठार, गोकुळनगर पठार, विठ्ठलनगर, ज्ञानेश सोसायटी, यशोदीप चौक, मामासाहेब मोहोळ शाळा परिसर, अमरभारत सोसायटी, गणपती माथा परिसर, एनडीए रोडचा काही भाग, पॉप्युलर कॉलनी इत्यादी.

लष्कर पाणीपुरवठा अंतर्गत बेकर हिल टाकीवरून पाणीपुरवठा होणारा भाग : लुल्ला नगर, कोंढवा गावठाण, भाग्योदय नगर, मिठा नगर, कौसर बाग, एनआयबीएम परिसर, साळुंखे विहार परिसर, वानवडी बेकर हिल टाकीवरील भाग (आझादनगर, केदारीनगर, गंगा सॅटेलाईट सोसायटी परिसर, शिंदे छत्री परिसर, जगताप चौक परिसर, जांभूळकर चौक ते शिवानंद गार्डन व त्याखालील तात्या टोपे सोसायटी, परमारनगर पर्यंतचा भाग) इत्यादी.

नवीन व जुने होळकर जलकेंद्र अंतर्गत बंद असणारा भाग : मुळा रोड, खडकी कँटॉनमेंट संपूर्ण परिसर, MES, HE Factory, हरीगंगा सोसायटी इत्यादी.

कोंढवे-धावडे जलकेंद्र : वारजे हाय-वे परिसर, रामनगर, उत्तम नगर, शिवणे, कोंढवे धावडे, न्युकोपरे.

वडगाव जलकेंद्र परिसर : दत्तनगर, टेल्को कॉलनी परिसर, संतोषनगर मुख्य रस्ता महावीकुंज, रेलीकॉन, दत्तनगर-आंबेगाव रस्ता, दत्तनगर चौक, संतोषनगर व अंजलीनगर परिसर, आगम मंदिर परिसर, गुरूद्वारा इत्यादी परिसर, कात्रजगाव, गुजरवाडी फाटा, निंबाळकर वस्ती, उत्कर्ष, राजस, इंद्रप्रस्थ, भूषण सोसायटी परिसर, सुखसागर नगर भाग-१ व भाग-२, कात्रज कोंढवा रस्ता, शिवशंभोनगर, गोकुळनगर, श्रीकृष्ण मंदिर परिसर, इस्कॉन मंदिर परिसर, टिळेकरनगर, येवलेवाडी, कोंढवा गाव, लक्ष्मीनगर परिसर, काकडे वस्ती, अशरफनगर, ग्रीनपार्क, साईनगर, गजानन नगर, राजीव गांधी नगर, खडीमशीन परिसर, बालाजीनगर, श्रीहरी सोसायटी, गुरूदत्त सोसायटी, पुण्याई नगर, सिंहगड रस्ता परिसर, हिंगणे, आनंदनगर, वडगाव, धायरी, आंबेगाव पठार, धनकवडी, भारती विद्यापीठ परिसर, कोंढवा बुद्रुक, आंबेगाव खुर्द, आंबेगाव बुद्रुक, सहकारनगर भाग-२ वरील भाग, आंबेडकर नगर, टिळकनगर परिसर, दाते बस स्टॉप परिसर इत्यादी काही भाग, सच्चाई माता टाकी, सुंदामाता नगर, वंडर सिटी, मोरेबाग, पवार हॉस्पिटल परिसर, केदारेश्वर टाकी, सुंदरबन सोसायटी, शेलार मळा, कात्रज गावठाण, भारत नगर, वरखडे नगर तसेच संपूर्ण येवलेवाडी परिसर इत्यादी.

यासोबतच शुक्रवार  ११  रोजी काही भागांत सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी पाण्याचे योग्य नियोजन करावे व प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात आले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: