Devendra Fadnavis | फेक नरेटिव्हविरुद्ध भाजपा कार्यकर्त्यांनी सज्ज व्हावे – मुख्यमंत्री फडणवीस

HomeBreaking News

Devendra Fadnavis | फेक नरेटिव्हविरुद्ध भाजपा कार्यकर्त्यांनी सज्ज व्हावे – मुख्यमंत्री फडणवीस

Ganesh Kumar Mule Aug 31, 2026 8:38 PM

Analysis | Kasba By-election | भाजपासाठी कसब्याची पोटनिवडणूक सोपी नाही, हे नक्की! 
By election | प्रचाराच्या तोफा थंडावल्या | रविवारी मतदान | जनता कुणासोबत महाविकास आघाडी कि महायुती?
Muralidhar Mohol Pune Loksabha ‘मोहोळ’ यांच्या नावावर ‘मोहोर’! पुणे लोकसभेसाठी भाजपकडून मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी! 

Devendra Fadnavis | फेक नरेटिव्हविरुद्ध भाजपा कार्यकर्त्यांनी सज्ज व्हावे – मुख्यमंत्री फडणवीस

 

Pune News – (The Karbhari News Service) – काँग्रेसने माओवादापासून स्फूर्ती घेत खोटेनाटे सांगून देशात अराजक माजवण्याचा विडा उचलला आहे. विरोधकांकडून फेक नरेटिव्ह पसरवण्याचे उद्योग सुरु आहेत, त्याविरुद्ध भाजपा कार्यकर्त्यांनी लढण्यासाठी सज्ज व्हावे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. (Maharashtra News)

भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीच्या समारोपप्रसंगी सोमवारी पुण्यात ते बोलत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश 2047 पर्यंत विकसित भारत होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. त्यावेळी महाराष्ट्र 2030 पर्यंत तीन ट्रिलियनची अर्थव्यवस्था करून प्रत्येक नागरिकाचे स्वप्न पूर्ण करेल. महायुतीचे सरकार संकटांना सामोरे जात राज्यात परिवर्तन घडवेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अंतिम भाषणात अराजकतेचे संकट समजावून सांगितले होते. आज तेच संकट संविधानाचे नाव घेऊन आपल्याविरुद्ध वापरण्याचा प्रयत्न सुरु आहे, असेही फडणवीस म्हणाले.

या बैठकीला विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, पंकजा मुंडे, गिरीश महाजन, गणेश नाईक, राधाकृष्ण विखे पाटील, अतुल सावे, माधुरी मिसाळ, राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. भारती पवार, आमदार अमित साटम, माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, सुधीर मुनगंटीवार आदी उपस्थित होते.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: