Pune PMC News | पुण्यात डासोत्पत्ती रोखण्यासाठी महापालिकेची व्यापक उपाययोजना

Homeadministrative

Pune PMC News | पुण्यात डासोत्पत्ती रोखण्यासाठी महापालिकेची व्यापक उपाययोजना

Ganesh Kumar Mule Aug 31, 2026 7:54 PM

DCM Eknath Shinde Birthday | पुण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त ६१ किलो लाडू मोदक अर्पण व श्रीमंत दगडूशेठ गणपती महाआरतीचे आयोजन!
Food Festival | पुण्यात तीन दिवस सवलतीच्या दरात खरेदी करा खाद्यपदार्थ  | जाणून घ्या महापालिकेच्या फूड फेस्टिवलविषयी 
Uruli Devachi | Fursungi | कचरा डेपोची जागा मनपा हद्दीत ठेऊन उरुळी व फुरसुंगी गावे वगळली | राज्य सरकारकडून अधिसूचना जारी

Pune PMC News | पुण्यात डासोत्पत्ती रोखण्यासाठी महापालिकेची व्यापक उपाययोजना!

 

Pune Weather – (The Karbhari News Service)-  सध्या डासोत्पत्तीस पूरक हवामान असल्याने डेंग्यू, चिकनगुनिया, झिका सारख्या कीटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुणे महापालिकेने विविध विभागांना पाणीसाठे व डासोत्पत्तीची ठिकाणे तातडीने नष्ट करण्याच्या सूचना दिल्या आहेत. (PMC Health Department)

अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर यांच्या अध्यक्षतेखाली ३१ ऑगस्ट रोजी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मागील तीन वर्षातील डेंग्यू, चिकनगुनिया, मलेरियाचा आढावा घेण्यात आला. सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. राजेश दिघे यांनी ४१ प्रभागातील केसेसचे मॅपिंग सादर केले.

बैठकीत सर्व खातेप्रमुखांना विभागनिहाय जबाबदाऱ्या देण्यात आल्या. आरोग्य विभागाने डासोत्पत्तीची ठिकाणे नष्ट करून प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. अतिक्रमण विभागाने जप्त साहित्यात पाणी साचू नये याची काळजी घ्यावी आणि रस्त्यावरील टायर व्यवसायावर कारवाई करावी.

घनकचरा विभागाने थर्माकोल, नारळाच्या करवंट्या, निरुपयोगी साहित्याची विल्हेवाट लावावी. घंटागाड्यांवर जनजागृतीच्या ध्वनिफिती वाजवाव्यात. उद्यान विभागाने कारंज्यांमध्ये गप्पी माशांची पैदास करावी आणि बॅनर्स लावावेत.

पर्यावरण विभागाने मुळा-मुठा नदीपात्र, मांजरी, होळकर पूल, म्हाळुंगे-पाषाण तलाव येथील जलपर्णी काढावी. बांधकाम विभागाने निर्माणाधीन इमारतींवर पाणी साचू नये यासाठी कारवाई करावी.

पथ विभागाने रस्त्यावरील ड्रेनेज आणि चेंबर्सची सफाई करावी. भवन रचना विभागाने महापालिकेच्या इमारती, शाळा, शौचालये, तलावांच्या टाक्यांना झाकणे बसवावीत.

माहिती व जनसंपर्क विभागाने वृत्तपत्र आणि सोशल मीडियातून नागरिकांना आठवड्यातून एक कोरडा दिवस पाळण्याचे, टेरेसवरील भंगार, टायर, डबे काढण्याचे आवाहन करावे.

प्रत्येक विभागासाठी नोडल अधिकारी नेमण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांनीही घर, सोसायटी आणि दुकान परिसरात पाणी साचू नये याची काळजी घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

—

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: