Pune Missing Road | पुणे शहरातील ‘मिसिंग रोड’च्या कामांना गती देण्याचे महानगरपालिका आयुक्त, जिल्हाधिकारी यांचे निर्देश

Homeadministrative

Pune Missing Road | पुणे शहरातील ‘मिसिंग रोड’च्या कामांना गती देण्याचे महानगरपालिका आयुक्त, जिल्हाधिकारी यांचे निर्देश

Ganesh Kumar Mule Aug 28, 2026 9:15 PM

Naval Kishore Ram IAS | कर्मचारी, अधिकाऱ्यांना शिस्त लावून त्यांची काळजी घेणारे आणि पर्यायाने शहराची काळजी घेणारे महापालिका आयुक्त नवल किशोर राम!
PMC CAFO | मुख्य लेखा व वित्त विभागात कामकाजाची विभागणी | उल्का कळसकर यांच्याकडे खर्च तर घाडगे यांच्याकडे महसूलची जबाबदारी
Pune Municipal Corporation | महापलिकेत सरळसेवेने भरती करण्यासाठी कर्मचारी निवड समिती गठीत!

Pune Missing Road | पुणे शहरातील ‘मिसिंग रोड’च्या कामांना गती देण्याचे महानगरपालिका आयुक्त, जिल्हाधिकारी यांचे निर्देश

 

Pune News – (The Karbhari News Service) – पुणे शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी विविध ठिकाणी आवश्यक असलेल्या ‘मिसिंग रोड’च्या कामांचा आढावा घेऊन प्रलंबित भूसंपादन व अन्य अडचणी तातडीने दूर करण्याच्या सूचना महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम आणि जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिल्या. (PMC Wih Collector Jitendra Dudi IAS)

जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली पुणे शहरातील मिसिंग रोडच्या अनुषंगाने बैठक झाली. पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्यासह पुणे महानगरपालिकेच्या अतिरिक्त महापालिका आयुक्त (जनरल) श्रीमती पवनीत कौर, अतिरिक्त आयुक्त ( विशेष ) श्री. ओमप्रकाश दिवटे, शहर मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत शहरातील विविध मिसिंग रोडची सद्यस्थिती, आवश्यक भूसंपादन, उपलब्ध जागा, संबंधित मालमत्ता, रस्ते जोडणीसाठी आवश्यक कार्यवाही तसेच प्रलंबित विषयांचा आढावा घेण्यात आला.

शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि विविध भागांतील रस्ते जोडणी अधिक सक्षम करण्यासाठी मिसिंग रोडची कामे महत्त्वाची आहेत. त्यामुळे संबंधित रस्त्यांच्या कामांसाठी आवश्यक भूसंपादन व प्रशासकीय कार्यवाहीला गती देऊन प्रलंबित बाबींचा तातडीने निपटारा करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी डुडी यांनी दिले.

महानगरपालिका व जिल्हा प्रशासनाच्या संबंधित विभागांनी परस्पर समन्वयाने कार्यवाही करून कामांच्या प्रगतीचा नियमित आढावा घ्यावा, असेही जिल्हाधिकारी डुडी यांनी सांगितले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: